मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनुष्का-विराटला एक मुलगी असून वामिक
मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनुष्का-विराटला एक मुलगी असून वामिका असं तिचं नाव आहे. आता त्यांच्या कुटुंबात आणखी एका सदस्याची भर पडणार आहे. त्या दोघांविषयी ही बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या बातमीविषयी… खरंतर एका रिपोर्टनुसारस, अनुष्का शर्मा ही प्रेग्नंट आहे. ते दोघेही त्यांच्या दुसऱ्या बाळासाठी आनंदी आहेत. मात्र, दोघांनी अधिकृतपणे यावर काहीही वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे त्यांचे चाहते ते दोघं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी कधी अधिकृत करतील याच्या प्रतिक्षेत आहेत. रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा आणि विराट हे दोघेही त्यांच्या पहिल्या प्रेग्नंसी प्रमाणे ही बातमी लगेच नाही तर काही काळानंतर देणार आहेत. तर अनुष्का गेल्या काही काळापासून कुठेही स्पॉट झालेली नाही. ती या सगळ्यापासून लांब राहत आहे. इतकंच नाही तर अनुष्का विराटसोबत नेहमी प्रमाणे त्याला पाठिंबा देण्यासाठी जशी स्टेडियममध्ये किंवा त्याच्या मॅचला जाते तशी यावेळी ती जाणार नाही आहे. आणखी एक माहिती समोर आली असून विराट आणि अनुष्का यांनी नुकतीच रुग्णालयात भेट दिली होती. त्यावेळी पापाराझींनी त्यांचे फोटो काढले मात्र, त्यावेळी त्या दोघांनी पापाराझींना विनंती केली की हे फोटो कुठेही पब्लिश करू नये. तर लवकरच ते स्वत: ही बातमी सगळ्यांसोबत शेअर करतील
COMMENTS