Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयातमधील व्हायरल व्हिडीओप्रकरणी एक निलंबित तर एकीची बदली का ?

किस्कींदा पांचाळ यांचा सवाल

बीड प्रतिनिधी - बीड येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दि.17/07/2023 रोजी रुग्णांकडून व रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतांनाचा व्हिडीओ स्टिंग ऑपरेशन

Maharashtra : फडणवीस गडकरींच्या बैठकीनंतर भाजप नगरसेवकांची झोप उडाली…! (Video)
सहकारी कारखान्यांना मिळणार शासन हमीवर कर्ज
Mumbai : आघाडीत विसंवाद? सोमय्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री अंधारात? (Video)

बीड प्रतिनिधी – बीड येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दि.17/07/2023 रोजी रुग्णांकडून व रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतांनाचा व्हिडीओ स्टिंग ऑपरेशन करुन तो व्हिडीओ व्हायरल झाला होता. सदरील व्हिडीओ मिडीयामध्ये पसरल्यानंतर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी या व्हिडीओमध्ये पैसे घेतांना दिसणार्या पैकी एकजणीला निलंबित केले असून दुसरीची मात्र फक्त बदली करुन तिच्यावर एवढी मेहेरबानी का? असा प्रश्न निर्माण होऊन यात जिची बदली झाली आहे तिचे निलंबन करु नये म्हणून काही अनागोंदी किंवा आर्थिक देवान घेवाणीतून तिच्यावर सॉफ्ट कार्यवाही झाली की काय? म्हणून एकच गुन्हा असतांना दुसरीला सुद्धा समान शिक्षा झाली पाहीजे करीता तिला सुद्धा निलंबित करण्याची मागणी विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा हिंदु महासभा मराठवाडा महिला अध्यक्षा सौ.किस्कींदाताई पांचाळ यांनी जिल्हा सिव्हील सर्जन यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.
 सदरील प्रकरणात कार्यवाही करावी करीता सौ.किस्कींदाताई पांचाळ यांनी आवाज उठवून कार्यवाही करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी बीड आरोग्य उपसंचालक लातूर यांना देखील निवेदन देणार असल्याचे म्हटले असून सर्वांना समान कायदा त्यानुसार या रुग्णांकडून लाच घेणार्या जिल्हा रुग्णालयातील सदरील दोन्ही सफाई कामगारांवर समान कार्यवाही करावी व एक जणीला जसे निलंबित केले तसे दुसरीला देखील निलंबित करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्षा तथा हिंदु महासभा मराठवाडा महिला अध्यक्षा सौ.किस्कींदाताई पांचाळ यांनी दिला आहे.

COMMENTS