Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; 13 हजार 177 प्रकरणे निकाली

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील पक्षकारांची वाद व वादपूर्व प्रकरणे ही सामंजस्याने व सुसंवादाने तडजोड

इस्लामपुरात राज्यपाल कोश्यारींच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन; पुरोगामी समविचारी पक्ष संघटनेच्या वतीने निषेध
दुचाकी-ट्रक धडकेत युवक जागीच ठार; एक जखमी
किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील पक्षकारांची वाद व वादपूर्व प्रकरणे ही सामंजस्याने व सुसंवादाने तडजोडीने निकाली निघण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 13 हजार 177 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तृप्ती जाधव यांनी दिली.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यात 10 हजार 136 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी 1 हजार 667 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. यामध्ये 80 कोटी 1 लाख 72 हजार 570 रुपये वसूली करण्यात आली. तसेच वादपूर्व 19 हजार 175 प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी एकूण 11 हजार 510 प्रकरणे निकाली निघून 5 कोटी 30 लाख 43 हजार 204 रुपयांची वसूल करण्यात आली. लोकअदालतीमध्ये एकूण 13 हजार 177 प्रकरणे तडजोडीने निघाली. तसेच 7 ते 11 मार्च 2022 या कालावधीमधील स्पेशल ड्राईव्हमध्ये सातारा जिल्ह्यात एकूण 1 हजार 28 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी एकूण 19 पॅनेल तयार करण्यात आले होते. यामध्ये महिलांसाठी एक पॅनेल तयार करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये वैवाहिक वाद, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणे, कर्ज धनादेश न वठल्याचे प्रकरणे इत्यादींचा समावेश आहे. वादपूर्व प्रकरणात पतसंस्था, फायनान्स कंपन्या, बँकांची कर्जे, दुरध्वनी व विद्यूत देयके आणि ग्रामपंचायत मालमत्ता, पाणी पट्टी कर वसूली इत्यादी प्रकरणांचा समावेश होता. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी पक्षकार, विधिज्ञ, सर्व न्यायिक अधिकारी, पोलीस, विधी स्वयंसेवक आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. राष्ट्रीय लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तृप्ती जाधव यांनी दिली.

COMMENTS