Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलापुरातील आंदोलनाला हिंसक वळण

मुंबई ः कोलकात्यातील घटना ताजी असतांना महाराष्ट्रातील बदलापुरमध्ये चार वर्षांच्या दोन चिमुरडीवर एका नामांकित शाळेतील सफाई कर्मचार्‍याने लैगिंक अत

राज्यात काँगे्रसला पडणार खिंडार ?
येडियुरप्पांवर लैंगिक शोषणाचे आरोपपत्र दाखल
तुमचे आजचे राशीचक्र मंगळवार, २२ जून २०२१ l पहा LokNews24

मुंबई ः कोलकात्यातील घटना ताजी असतांना महाराष्ट्रातील बदलापुरमध्ये चार वर्षांच्या दोन चिमुरडीवर एका नामांकित शाळेतील सफाई कर्मचार्‍याने लैगिंक अत्याचार केल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पालकांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी आंदोलन केले. बदलापूरचे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी मंगळवारी बदलापूर बंदची हाक दिली होती. आंदोलक आक्रमक होत रेल्वे स्थानकावर येऊन ट्रकवर उतरले होते. त्यांनी लोकल अडवली आहे. बदलापूरमध्ये आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी ज्या शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला होता, त्या शाळेती तोडफोड केली आहे. तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकावर जमा झालेल्या आंदोलकांनी दगडफेक करत घोषणाबाजी केली आहे.
आंदोलकांना पांगण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक सुरू केली आहे. दोषींना ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्‍याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. शाळेतील एका सफाई कर्मचार्‍याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर आता पालक आणि बदलापूरमधील अनेक नागरिक संतप्त झाले असून ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. बदलापूरमधील या संतापजनक घटनेवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे फडणवीस म्हणाले.

संतप्त नागरिकांकडून रेल रोको आंदोलन – बदलापुरमधील नागरिक या घटनेने आक्रमक झाले असून, त्यांनी सोमवारी रेल रोको आंदोलन केले. यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली असून अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणार्‍या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झाल्या आहेत. तर अंबरनाथवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणार्‍या गाड्यादेखील पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहेत. बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांकडून रेल रोको आंदोलन करण्यात आलं आहे. बदलापूरच्या खासगी शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याने संतप्त पालक आणि बदलापूर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

आरोपीला 2 तासात अटक ः गृहमंत्री फडणवीस – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश दिले आहे. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहे.

आरोपींना कठोर शिक्षा होईल ः मुख्यमंत्री शिंदे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी पोलिस आयुक्तांशी स्वत: बोललो, त्या आरोपीला अटक झाली आहे, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलम लावायला सांगितले आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल. खटल्यास विशेष पीपी नेमण्यास सांगितले आहे. संस्था चालकांचीही चौकशी करुन जे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करु. पोलिसांना अटेम्पट टू रेप हा खटला दाखल करायला सांगितले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

शाळेचा प्रसिद्ध केला माफीनामादरम्यान शाळा प्रशासनाने एक माफीनामा प्रसिद्ध केला आहे. मुलींवर अत्याचार करणार्‍या सफाई कर्मचारी पुरवणार्‍या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्यात आला असून पालकांची शाळेने माफी मागितली आहे. तसेच हा प्रकार  दुर्दैवी, घृणास्पद व निंदनीय असल्याचे देखील शाळेने म्हटले आहे.  संबंधित कर्मचार्‍यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी आग्रही असल्याचे देखील म्हटले आहे.

गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी लावले 12 तास ः पालकांचा आरोप – बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. सफाई कर्मचार्‍यानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर मुलींच्या पालकांनी याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास 12 तास लावले. असा आरोप पालकांनी केला होता. यावरून पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलिस ठाण्यात दोन नवीन पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली.

COMMENTS