Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाअभावी पिके कोमेजल्याने शेतकरी चिंतेत

शिरुर अनंतपाळ प्रतिनिधी - पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची वाढ खुंटली

महाबळेश्‍वर येथून वेण्णा नदी संवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ
राहुरी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या

शिरुर अनंतपाळ प्रतिनिधी – पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून माळरानावरील पिके कोमेजली आहेत. पावसाअभावी शेतक-यावर अस्मानी संकट कोसळले असून शेतकरी चिंतेत आहेत सध्या सोयाबीनसह सर्व खरीप पिके वाढीच्या अवस्थेत असताना पाऊस गायब झाला आहे. आणखी काही दिवस पावसाने ओढ दिल्यास हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पिके कोमेजू लागली असून ऐन पावसाळ्याच्या कालावधीत शेतक-याचा उन्हाळा झाला आहे.
पेरणीनंतर समाधानकारक पावसामुळे खरीप पिकांची चांगली वाढ झाली. सध्या सोयाबीन फुलो-यात असून शेंगा भरण्यासाठी पावसाची अत्यंत आवश्यकता आहे मात्र गेली बारा दिवसांपासून पावसाने दांडी आहे. ऐन पावसाळ्यातच पाऊस गायब झाल्याने पिकांची अवस्था दैयनिय झाली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात पावसाच्या दीर्घ विश्रांती दरम्यान खरीपामधील आंतरमशागत देखील झाली आहे. कोळपणी व फवारणीनंतर पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना सध्या पावसाने दडी मारली पिकांनी माना टाकल्या आहेत

COMMENTS