इस्लामपूर : मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या विरोधात निदर्शने करताना भाजपचे विक्रम पाटील, विजय कुंभार, अर्जुन पाटील व महिला. पाणी टंचाईवर महिला संत
पाणी टंचाईवर महिला संतप्त; पोलिसात साबळे हरवल्याची तक्रार
इस्लामपूर / प्रतिनिधी : पाण्याची वारंवार मागणी करूनही शिवनगर व परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करीत या परिसरातील महिलांनी मुख्याधिकारी साबळे यांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. भाजपचे विक्रम पाटील, विजय कुंभार, अर्जुन पाटील, धनश्री चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
पाटील म्हणाले, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या शहरातील जनतेची पिळवणूक करण्यासाठी या मुख्याधिकार्यांना येथे आणले आहे. पाण्यासाठी लोक टाहो फोडत असताना ही अनेक महिने त्यावर काहीच उपाययोजना होत नाहीत. आरोग्य सुविधांचे तीन तेरा वाजले आहेत. आंदोलक निवेदन देण्यासाठी अनेक वेळा पालिकेत गेल्यानंतर मुख्याधिकारी तेथे हजर नव्हते. त्यामुळे मुख्याधिकारी हरवल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली. यावेळी अर्जुन पाटील, संजय कुरणे, धनश्री चव्हाण, मनीषा चव्हाण, माधुरी सरगर यांनी मनोगत व्यक्त केले.
COMMENTS