Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये म्यानमार सीमेजवळ पुन्हा हिंसाचार

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूरमधील म्यानमार सीमेजवळील मोरे गावात घरांची जाळपोळ आणि गोळीबार करण्यात आला. मोरे गाव म्यानमार सीमेला लागून आहे. यामध्ये

पारनेर टँकर घोटाळ्याचा तपास ईडीकडे सोपवा  
Madha : प्रहार शेतकरी संघटनेच्यातालुका संघटकपदी संभाजी उबाळे यांची निवड (Video)
संभाजीनगरमध्ये पहिले शिक्षक साहित्य संमेलन

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूरमधील म्यानमार सीमेजवळील मोरे गावात घरांची जाळपोळ आणि गोळीबार करण्यात आला. मोरे गाव म्यानमार सीमेला लागून आहे. यामध्ये कुकी आणि मेईतेई या दोन्ही समाजाचे लोक गावात राहतात. मात्र, कुकी लोकांची संख्या अधिक आहे. कांगपोकपी जिल्ह्यात जमावाने सुरक्षा दलाच्या दोन बसेस जाळल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
 अधिकार्‍यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी दिमापूरहून दोन बस येत होत्या. जमावाने त्याला थांबवून आतमध्ये कोणी विरोधी समाजातील व्यक्ती बसली आहे का, याची तपासणी सुरू केली. दरम्यान, बसेस जाळण्यात आल्या. मिझोराममध्ये मंगळवारी कुकी समुदायाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. याला पाठिंबा देत परिवहन सेवा बंद ठेवण्यात आली असून मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी सरकारी कार्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लोकांनी मणिपूरच्या लोकांसाठी कपडेही दान केले.

COMMENTS