हुंड्यासाठी होणार्‍या छळामुळे जावयाने केली आत्महत्या…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हुंड्यासाठी होणार्‍या छळामुळे जावयाने केली आत्महत्या…

अहमदनगर/प्रतिनिधी : हुंड्याच्या पैशासाठी वारंवार तगादा करून होणार्‍या मानसिक त्रासाला कंटाळून नवविवाहित जावयाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घट

 जामखेडमध्ये घरफोडी – लाखोंचा ऐवज लंपास
अहमदनगर क्लबवर एकता पॅनलचे वर्चस्व ; सचिवपदी नरेंद्र फिरोदिया
कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अहमदनगर/प्रतिनिधी : हुंड्याच्या पैशासाठी वारंवार तगादा करून होणार्‍या मानसिक त्रासाला कंटाळून नवविवाहित जावयाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नगरमधील भवानीनगर परिसरात घडली. येथील पारधी समाजातील धनेश चव्हाण व त्याची पत्नी पूजा चव्हाण यांचा विवाह 7 जानेवारी 2021 रोजी झाला होता. पारधी समाजाच्या रुढी परंपरेनुसार मुलीकडच्यांना हुंडा द्यावा लागत असल्याने 3 लाख रुपये देणे ठरले होते. त्यापैकी 50 हजार रुपये दिले होते. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले होते. परंतु मुलीकडच्यांनी जावई धनेश यास सारखा पैशाचा तगादा लावला व त्याचा छळ केला. या जाचाला कंटाळून धनेश चव्हाण याने विषारी औषध घेतल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे धनेशच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. याबाबत पत्नी पूजा चव्हाण, सासरा कुकलाल काळे, सासु शैला काळे, मेहुणा राहुल काळे, निलेश काळे (सर्व रा. मोरवाडी, कोळगाव, श्रीगोंदा) यांची चौकशी करून व या दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धनेशचे वडील कदम चव्हाण व कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले आहे.

COMMENTS