Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार

इंटरनेट सेवा केली बंद ः मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापूर्वी जाळपोळ

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूर राज्यातील चुराचांदपूरमध्ये मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह काही विकासकामांचे लोकार्पण करणार होते. मात्र त्यापूर्वीच आंदोलक

मनापासून केलेल्या कामातच देव भेटतो – भास्करराव पेरे पाटील
परमबीर आणि राज्य सरकारलाही तात्पुरता दिलासा
बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतीमान करणार

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूर राज्यातील चुराचांदपूरमध्ये मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह काही विकासकामांचे लोकार्पण करणार होते. मात्र त्यापूर्वीच आंदोलकांनी सभेच्या ठिकाणी तोडफोड केली आणि आग लावली. हिंसाचार करणार्‍या जमावाचे नेतृत्व स्थानिक नेते करत आहेत.
भाजपच्या नेतृत्वाखालील मणिपूर सरकारच्या निर्णयाचा हा गट निषेध करत आहे. या निर्णयानुसार आदिवासींसाठी राखीव व संरक्षित वनक्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या आदेशाच्या बहाण्याने राज्य सरकार चर्च पाडत असल्याचा आरोप आदिवासी मंच करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने चुराचांदपूर जिल्ह्यात कलम 144 लागू केले असून इंटरनेट बंद केले आहे. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आदिवासी नेत्यांच्या मंचाने सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत संपूर्ण चुराचांदपूर बंदची हाक दिली असताना जमावाने हा हल्ला केला. चुराचंदपूर जिल्ह्याचे एडीएम एस थियेनलटजॉय गंगटे म्हणाले की, जिल्ह्यातील शांतता भंग होण्याची भीती आणि मालमत्तेला गंभीर धोका लक्षात घेऊन मोठ्या मेळाव्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आज होणार की नाही याबाबत प्रशासनाकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. बेकायदा बांधकामाच्या आरोपावरून मणिपूर सरकारने 11 एप्रिल रोजी इम्फाळ पूर्वेतील तीन चर्च पाडले होते. यामध्ये इव्हँजेलिकल बॅप्टिस्ट कन्व्हेन्शन चर्च, इव्हँजेलिकल लुथेरन चर्च आणि कॅथोलिक होली स्पिरिट चर्च यांचा समावेश होता. चर्च पाडण्याच्या आदेशाविरोधात मणिपूर उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती, परंतु न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. चर्चने बांधकामासाठी कायदेशीर परवानगी घेतल्याचे न्यायालयात सिद्ध करण्यात अपयश आले होते.

COMMENTS