Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

मुंबई प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगकडूनही तयारी केली जात असून लवकरच

राहुल नार्वेकर विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष
राजकीय फटाके फुटायला अजून वेळ
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक

मुंबई प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगकडूनही तयारी केली जात असून लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षही कसून तयारीला लागले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात भाजपाने कंबर कसून तयारी केली असून एक मोठी खेळी केली आहे.  दक्षिण मुंबईवर भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेक यांना थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरवण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकर यांना निवडणूक लढण्याचे आदेश मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अरविंद सावंत यांच्याविरोधात नार्वेकर मैदानात उतरणार असल्याचे वृत्त आहे .शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे सध्या इथले खासदार आहेत. आणि त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याचं समोर येत आहे. राहुल नार्वेकर हे कोकणी , मराठी चेहरा आहे. त्यामुळे त्यांना या भागात निवडणुकीसाठी उतरवण्यास भाजप सज्ज झालं आहे. त्या अनुषंगाने नार्वेकर यांनी अनेक कार्यक्रमासही सुरूवात केली आहे. दक्षिण मुंबईचा हा मतदारसंघ घेण्यासाठी भाजपतर्फेही विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

COMMENTS