Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजितदादांच्या आठवणीने विधानभवन गहिवरले

महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री ः मुख्यमंत्री फडणवीसांकडून भावनिक कौतुकमुंबई ः महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोम

जमीन घोटाळा प्रकरणी मंत्री सत्तार गोत्यात
अजित पवार : टग्या ते लाचार नेता !
अजित पवारांचा पक्षासह चिन्हावर दावा

महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री ः मुख्यमंत्री फडणवीसांकडून भावनिक कौतुक
मुंबई ः महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. दिवंगत अजितदादा पवार यांच्या आठवणीने विधानभवन चांगलेच गहिरवरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंत्री एकनाथ शिंदेंसह विधिमंडळातील सहकार्‍यांना अजितदादांवर बोलतांना गहिवरून आले होते. बोलतांना शब्द फुटत नव्हते, मात्र हुंदका गिळून नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केला.
अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. अजितदादा यांची प्रशासनावर पकड होती, त्यांच्यामध्ये स्पष्टवक्तेपणा होता, तसेच काम करण्याची उरक होती, अजितदादा महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, अशा भावनिक शब्दांत त्यांनी कौतुक केले. महाराष्ट्रात वसंतदादा आणि अजितदादा ही दोन नावे त्यांच्या कामामुळे कायम स्मरणात राहतील, असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री म्हणाले की, दादांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक असलेले सर्व गुण होते. निर्णयक्षमता, वेळेचे भान आणि प्रशासनावरची पकड या बाबतीत ते नेहमीच ठाम होते. राज्याला एक सक्षम नेतृत्व लाभले असते; मात्र ते वास्तवात घडले नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. दादांची राजकीय कारकीर्द दीर्घ आणि प्रभावी होती. पुढील काळातही ते मोठी भूमिका बजावतील, अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र आयुष्याच्या प्रवासात पहिल्यांदाच त्यांनी टायमिंग चुकवले, असे सांगताना मुख्यमंत्री भावूक झाले. वक्तशीरपणा ही त्यांची ओळख होती; त्यामुळे त्यांचे अचानक जाणे अधिक वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, त्यांचे आणि दादांचे नाते केवळ राजकीय मर्यादेत राहिले नाही. दादा माझ्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठे होते. खर्‍या अर्थाने ते माझे दादाच होते, असे सांगताना त्यांनी वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला. 2014 नंतर दोघांमध्ये अधिक जवळीक निर्माण झाली आणि गेल्या दशकभरात परस्परांमध्ये सुसंवाद आणि मैत्रीचे नाते दृढ झाले.

दादा तुमचा निर्णय चुकला, माघारी या ः उपमुख्यमंत्री शिंदे
दादा म्हणजे स्पष्टवक्तेपणा आणि वक्तशीरपणाचं प्रतीक होतं, असे सांगताना शिंदे यांचा आवाज दाटून आला. दादा, तुमचा हा निर्णय चुकलेला आहे, माघारी या, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सभागृहात नजर टाकली की ते डोळ्यासमोर उभे राहतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अधिवेशनाचा पहिला दिवस असताना गेली 22-23 वर्षे एकत्र काम केलेल्या सहकार्‍याबद्दल अशा प्रकारे बोलण्याची वेळ येणे हे अत्यंत वेदनादायी असल्याचे शिंदे म्हणाले. अजित पवारांसारखा नेता गमावणे ही राज्यासाठी मोठी हानी आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, असे सांगत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

जीव नकोसा होईल इतके आरोप टाळा ःउद्धव ठाकरे
राजकारण करताना एकमेकांवर टीका-प्रत्युत्तर होणे स्वाभाविक असले तरी आरोपांची पातळी इतकी खालावू नये की एखाद्याचा जीव नकोसा व्हावा, असा स्पष्ट संदेश उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत दिला. सोमवारी सभागृहात अजितदादा यांच्यावरील शोकप्रस्तावावर बोलताना त्यांनी हे मत मांडले. अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले होते. मात्र त्या आरोपांमुळे ते खचले नाहीत. त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर तो मानसिक ताण सहन न झाल्याने कोसळला असता; कदाचित टोकाचे पाऊल उचलले असते. पण अजित पवारांनी आरोपांना शब्दांनी नव्हे, तर कामगिरीतून उत्तर दिले, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

COMMENTS