युवकाला मारहाणीचा व्हिडीओ केला व्हायरल… गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवकाला मारहाणीचा व्हिडीओ केला व्हायरल… गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी ः श्रीगोंदा शहरातील एका महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणार्‍या एका तरुणाला वर्गात शिकत असताना बेंचवर बसण्याच्या कारणावरून झालेल्

अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील आरोपींची काढली धिंड
खरवंडी येथे पडक्या घरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या
प्रसिद्ध कोळसा व्यापारी भगवान राठोड यांचे निधन

अहमदनगर/प्रतिनिधी ः श्रीगोंदा शहरातील एका महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणार्‍या एका तरुणाला वर्गात शिकत असताना बेंचवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लाकडाने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण करीत या मारहाणीचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल माध्यमावर अपलोड करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारहाण करणार्‍या दोन युवकांना ताब्यात घेतले असून, चित्रीकरण करणार्‍या व घेऊन जाणार्‍या निळ्या रंगाच्या मोपेड गाडीचा पोलिस तपास करत आहेत. मारहाण झालेला आणि मारहाण करणारे अल्पवयीन आहेत.
श्रीगोंदे शहरात टवाळखोरांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच घडलेल्या या घटनेने याविषयी अधिक चर्चा सुरू झाली आहे. श्रीगोंदा शहरातील एका महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणार्‍या घुगलवडगाव येथील युवकाला दिनांक 7 डिसेंबर 21 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर सिद्धार्थनगर, श्रीगोंदा येथील दोन युवकांनी पेट्रोल पंपावर जाऊ, तुझ्याकडे एक काम आहे असे म्हणत त्यांच्याकडील मोपेड गाडीवर बसवून नेले. त्यानंतर पेट्रोल पंपाशेजारी फॅक्टरी रोड लगत असलेल्या बागेत दोघा आरोपींनी कॉलेज युवकाला दम दिला की, बेंचवर बसण्यावरून आमच्या मित्रांशी वाद का घातला? त्यांच्यासोबत का भांडण केले?, असे म्हणून शिवीगाळ करत पडलेल्या लाकडी काठ्या घेऊन त्याला मारहाण करण्यात आली. यामध्ये तो जखमी झाला आहे. आमच्या नादी लागला तर तुला श्रीगोंद्यात येणे कठीण करून टाकू, असा दमही त्याला दिला. हे सर्व होत असताना मारहाणीच्या घटनेचे चित्रीकरणही तेथे उपस्थित आरोपींच्या मित्रांनी केले आणि हा मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर टाकण्यात आला.
याबाबत संबंधित युवकाच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, निळ्या मोपेड गाडीवर घेऊन गेलेली गाडी आणि घटनास्थळी मारहाणीचे चित्रीकरण करणारे यांचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.

COMMENTS