Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराडला शोभायात्रेने विजय दिवस समारोहास प्रारंभ

कराड / प्रतिनिधी ः विजय दिवस समारोहात आज शोभा यात्रेने उत्साहात प्रारंभ झाला. विजय दिवस चौकातील विजय स्तंभास अभिवादन केल्यानंतर शोभा यात्रेस भा

कवठेएकंदजवळ विटा-सांगली बसवर दगडफेक; चालक जखमी
कडकनाथ महाघोटाळ्याच्या महारयत कंपनीच्या संचालकाला अटक
फलटण शहरात विनामास्क फिरणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा

कराड / प्रतिनिधी ः विजय दिवस समारोहात आज शोभा यात्रेने उत्साहात प्रारंभ झाला. विजय दिवस चौकातील विजय स्तंभास अभिवादन केल्यानंतर शोभा यात्रेस भाई गंगाराम गुजर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, सपोनि, गट शिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, राष्ट्रवादीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे यांच्या उपस्थितीत त्यास प्रारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार, विजय दिवस समितीचे विनायक विभूते, चंद्रकांत जाधव, सहसचिव विलासराव जाधव, अ‍ॅड. परवेझ सुतार, उद्योजक सलीम मुजावर, महालिंग मुंढेकर, सतीश बेडके, रत्नाकर शानभाग, प्रा. बी. एस. खोत, रमेश जाधव, मिनल ढापरे, भरत कदम, राजु अपिने, पौर्णिमा जाधव, आसमा इनामदार, प्राजक्ता पालकर, मिल्ट्री होस्टेलचे सहाय्यक अधिक्षक धनाजी जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.
शोभा यात्रेत येथील लाहोटी कन्याप्रशाळेचा महिला सबलीकरणांतर्गत तीचा सन्मान, टिळक हायस्कूलचा स्वच्छ भारत मिशन, एसएमएस इंग्लिश मेडीयम स्कूलचा पर्यावरण विषयक, शाहीन हायस्कूलचा भारतीय स्वयंसिध्दतेवर, पालिका शाळा क्रमांक बाराचा संविधान विषयक जनजागृती, कोटा ज्युनियर कॉलेजचा स्त्री भ्रूण हत्या, यशवंत हायस्कूलचा कारगील युध्दातील प्रसंगावर, कमला नेहरू ज्युनियर कॉलेजचा महिला सबलीकरण, दि. का. पालकर माध्यमिक शाळा, डॉ. द. शी. एरम अपंग सहाय्य संस्थेचा जय जवान जय किसान हे चित्ररथ सहभागी झाले होते.
सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे एनसीसी छात्र, आदर्श विद्यार्थी, आदर्श विद्यार्थीनी सहभागी झाले होते. विजय दिवस चौकातून सुरू झालेली पदयात्रा उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा नाका मार्गे कन्या शाळा, चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौकमार्गे विजय दिवस चौकात आली. भरत कदम यांनी सुत्रसंचालन केले.

COMMENTS