।संगमनेर : संगमनेरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याविरुद्ध पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करून अ
।संगमनेर : संगमनेरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याविरुद्ध पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपी डॉ. अमोल कर्पे याला न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.
पिडित मुलगी आरोपी डॉक्टरकडे उपचारासाठी गेली असताना ही घटना घडल्याचे तिच्या तक्रारीत नमूद केले आहे. यानंतर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून डॉ. कर्पे याला अटक केली. त्याच्या विरुद्ध पोक्सो कायद्याखाली कारवाई करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर केल्यावर १० दिवसांची पोलिस रिमांड देण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या घटनेमुळे समाज मनात रोष निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी या संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध करत डॉ. कर्पे याचे वैद्यकीय लायसन्स आणि रुग्णालयाचे परवाने तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, आरोपी डॉक्टरवर कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे, अशी भूमिका व्यक्त केली आहे.
आरोपीचा पूर्व इतिहास मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरवर यापूर्वीही अशाच प्रकारचे गंभीर आरोप होते, परंतु ते पोलिसांपर्यंत गेले नव्हते. यावेळी घटना प्रकाशात आल्याने त्यांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
आरोपी डॉक्टरला कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अशा अनैतिक व्यक्तींना कडक नियंत्रणाखाली ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी दुर्गावाहीनी संगमनेर शहर संयोजिका ॲड. सोनाली बोटवे, जिल्हा सहसंयोजिका शामल बेल्हेकर, दिपाली वाव्हळ, सौम्या बेल्हेकर उपस्थित होते.
COMMENTS