Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हेरेनियम क्लाउडने महसूल आणि निव्वळ नफ्यात  मजबूत वाढ नोंदवली  

नाशिक : मुंबईस्थित टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनी व्हेरेनियम क्लाउड लि.ने एकूण महसूल आणि निव्वळ नफ्यात मजबूत वाढीसह व्यवसाय ऑपरेशन्समध्ये मजबूत वाढ

ब्राह्मणेतर समाजाकडे श्रध्दास्थळांचा ताबा द्या!
सामाजिक न्याय विभागाची मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन टेम्पो योजना सुरु करावी
अग्निपथमुळे देशाचे सामर्थ्य वाढेल

नाशिक : मुंबईस्थित टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनी व्हेरेनियम क्लाउड लि.ने एकूण महसूल आणि निव्वळ नफ्यात मजबूत वाढीसह व्यवसाय ऑपरेशन्समध्ये मजबूत वाढ नोंदवली आहे. सप्टेंबर २०२३ ला संपलेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४- च्या सहामाहित  कंपनीने २०२३-२४ च्या  सहामाहीत २६.३७ कोटींच्या तुलनेत ९६.२५ कोटीचा स्टँडलोन निव्वळ नफा नोंदवला. जो वर्षभरात २६५ टक्के वाढला आहे. आर्थिक वर्ष  २०२२-२३ च्या तुलनेत १२५.५५ कोटींवरून २०२३-२४ च्या सहामाहित ३७७.३३ कोटी ऑपरेटिंग नफा झाला. जे एकूण उत्पन्नापेक्षा २०५.४% अधिक आहे. २०२४ च्या सहामाहीसाठी ईपीएस रु. २२.४४ प्रति शेअर आहे. अलीकडेच  एव्हरी इमरजिंग फ्राँटियरने ११ ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर २०२३ रोजी कंपनीचे एकूण ४.७६ लाख शेअर्स खरेदी केले. कंपनीकडे रु.१०.४५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत, कंपनीने व्यवसाय ऑपरेशन्सचा विस्तार करण्यासाठी यूएसए आणि यूएईमध्ये उपकंपन्या उघडण्यास मान्यता दिली आहे. विनायक वसंत जाधव यांची कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून तात्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीने नुकतेच आपले रु. ४९.४६ कोटी रुपयांचा राइट इश्यू यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.

COMMENTS