Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सची रिटेल विस्‍तारीकरणासह अग्रणी वाटचाल

नाशिकमध्‍ये नवीन शोरूम लाँच

नाशिक: गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकीच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने आज महाराष्‍ट्रातील नाशिक येथे नवीन शोरू

भारतीय टपाल खात्याव्दारे महिला सन्मान बचतपत्र योजना
संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर आता संजय राऊत यांचे खाजगी सुरक्षा रक्षक
भाजपची ‘मोदी का परिवार’ मोहीम

नाशिक: गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकीच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने आज महाराष्‍ट्रातील नाशिक येथे नवीन शोरूम – ईव्‍हीथिंगच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत विकसित करण्‍यात आलेली गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सची उत्‍पादने सुरक्षितता व आरामदायीपणा आणि दर्जात्‍मक कार्यक्षमता देण्‍यासाठी एर्गोनॉमिकली डिझाइन करण्‍यात आली आहेत. 

नवीन शोरूम रूंगता हायस्‍कूल बिल्डिंग, शॉप नं. ११, अशोक स्‍तंभ, नाशिक ४२२००१ येथे स्थित आहे. ईव्‍हीथिंग हे गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे शहरातील पहिले इलेक्ट्रिक वेईकल शोरूम आहे. हे शोरूम ६०० चौरस फूट जागेवर असून सर्व विक्री-पश्‍चात्त गरजा व ग्राहकांच्‍या गरजांसाठी सर्विस सेंटर आहे. प्रमुख अतिथी धरमवीर श्री सुनिल भाऊ बागुल आणि डॉ. राजेंद्र कलाल यांच्‍या हस्‍ते या शोरूमचे उद्घाटन करण्‍यात आले. प्रमुख ठिकाणी स्थित ईव्‍हीथिंगचे कार्यसंचालन ईव्‍हींचे व्‍यापक ज्ञान असलेल्‍या विक्री व सेवा व्‍यावसायिकांच्‍या अनुभवी टीमद्वारे पाहिले जाते. शोरूम गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सची संपूर्ण उत्‍पादन श्रेणी जसे इब्‍लू थ्रिल, इब्‍लू स्पिन, इब्‍लू रायनो, इब्‍लू फिओ व इब्‍लू रोझी दाखवते. उत्‍पादने २२,००० रूपये ते ३,४०,००० रूपये या एक्‍स-शोरूम किमतींपासून उपलब्‍ध आहेत. 

या उद्घाटनाबाबत मत व्‍यक्‍त करत गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्‍हणाले, ”पर्यावरणाप्रती वाढत्‍या जागरूकतेसह नाशिककरांनी जलदपणे इलेक्ट्रिक गतीशीलतेचा अवलंब केला आहे, ज्‍यामधून ईव्‍ही मालकीहक्‍काच्‍या फायद्यांबाबत वाढती जागरूकता दिसून येते. नाशिकमध्‍ये आमच्‍या पहिल्‍या शोरूमचे उद्घाटन अभिमानास्‍पद व उत्‍साहपूर्ण क्षण आहे, जेथे आम्‍ही रायपूरमधील आमच्‍या प्‍लांटमध्‍ये निर्माण करण्‍यात आलेली जागतिक दर्जाची उत्‍पादने डिलिव्‍हर करण्‍यास सज्‍ज आहोत.”

ईव्‍हीथिंगचे मालक श्री. रोहित डी. शुक्‍ला म्‍हणाले, ”गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सच्‍या उत्‍पादनांना त्‍यांची स्‍टायलिश डिझाइन, अद्वितीय आरामदायीपणा व किफायतशीरपणामुळे झपाट्याने लोकप्रियता मिळाली आहे. नाशिकमधील ग्राहकांनी इलेक्ट्रिक गतीशीलतेचा अवलंब करण्‍याप्रती प्रबळ इच्‍छा दाखवली आहे आणि ईव्‍हींसाठी प्रबळ मागणी होत आहे. आम्‍हाला आमच्‍या नवीन डिलरशिप्‍सच्‍या उद्घाटनाची घोषणा करताना आनंद होत आहे. तसेच आम्‍ही गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्ससोबत यशस्‍वी व लाभदायी सहयोगासाठी उत्‍सुक आहोत.” गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने विस्‍तारीकरण करण्‍यामध्‍ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि सध्‍या भारतभरात ५० डिलरशिप्‍सचे नेटवर्क आहे. कंपनीचा या आर्थिक वर्षाच्‍या शेवटी १०० डिलर्स असण्‍याचा मनसुबा आहे

COMMENTS