Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभांची वाणवा  

राहुरी ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, आपल्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय बड्या नेत्यांच्या सभा होतांना दिसून येत आहे. मात्र राहुरी तालुक्यात कोण

जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न ः आ. आशुतोष काळे
 सरकारने आरक्षणावर निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन
अल्पवयीन मुलीस आमीष दाखवून केले अपहरण

राहुरी ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, आपल्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय बड्या नेत्यांच्या सभा होतांना दिसून येत आहे. मात्र राहुरी तालुक्यात कोणत्याही मोठ्या व राष्ट्रीय नेत्यांच्या सभा होणार नसल्याने जागरूक मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांपाठोपाठ आता धनंजय मुंडे यांची 8 मे रोजी राहुरी तालुक्यात सभा होणार आहे.  लोकसभा निवडणुकीसाठी नेमका राहुरी तालुक्यातील निम्मा भाग 37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. मात्र या तालुक्यात भाजपच्या राष्ट्रीय बड्या नेत्यांची सभा पार पडलेली नाही.
राहुरी तालुक्याला निवडणुका आणि जाहीर, प्रचार सभा काही नव्या नाहीत. दरवर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुकां व्यतिरिक्त विविध मोठ्या संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते मंडळी नगर जिल्ह्यात येत असल्याने राहुरीशी संबंध त्याच्याशी जोडला जातो. लोकसभा निवडणुकीसाठी नेमका राहुरी तालुक्यातील निम्मा भाग 37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. राहुरी तालुक्यासह मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचार दौर्‍यांचा सध्या धडाका सुरू आहे. यापूर्वी निवडणुकांच्या निमित्ताने नगर जिल्ह्यात स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कै. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, उमा भारती, यांच्यासह राजेश खन्ना, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जयंत पाटील, सुप्रियाताई सुळे, अजित पवार यासह अन्य नेत्यांच्या प्रचार सभा ठिकठिकाणी झालेल्या आहेत. या लोकसभा निवडणुकीत मात्र आठ दिवसांपूर्वीच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सर्वेसर्वा शरद पवारांची मोठी प्रचार सभा झालेली आहे. नगरला 7 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर 11 मे ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शेवगाव येथे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 9 मे ला जामखेड, कोपरगाव येथे तर याच दिवशी अजित पवार यांची कर्जत व पारनेर येथे प्रचार सभा होणार आहे. धनंजय मुंडे यांची एकमेव सभा राहुरी होणार आहे . त्यामुळे आता 11 मे पर्यंत कोणत्या मोठ्या नेत्यांच्या सभा होणार ! याची चर्चा सुरू असताना केवळ अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांची एकमेव सभा राहुरी तालुक्यात होणार असल्याची माहिती समजली आहे . त्यामुळे राहुरी तालुक्यासह मतदारसंघातील जागरूक मतदारांमध्ये याची सध्या चर्चा सुरू आहे.

COMMENTS