Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘वंचित’चा ‘मविआ’सोबत अधिकृत काडीमोड

लोकसभेसाठी जाहीर केले 8 उमेदवार

अकोला ः महाविकास आघाडी लोकसभेसाठी सन्मानजनक जागा देत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने बुधवारी अधिकृरित्या आपण महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेत असल्या

वंचितच्या समावेशाबद्दल 15 दिवसात निर्णय घ्या
मविआ-वंचितची बोलणी फिस्कटली ?
भीमा-कोरेगावप्रकरणी आंबेडकरांची नोंदवणार साक्ष

अकोला ः महाविकास आघाडी लोकसभेसाठी सन्मानजनक जागा देत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने बुधवारी अधिकृरित्या आपण महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेत असल्याचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. त्यासोबतच वंचितने बुधवारी लोकसभेसाठी आपले 8 उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात धडकी भरली आहे.
यासंदर्भात बोलतांना आंबेडकर म्हणाले की, आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत. जरांगे पाटलांच्या फॅक्टरकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, असे आम्ही महाविकास आघाडीला सांगितले होते. मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेत आहोत. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे, हे मला माहीत आहे. मात्र मी लोकांची नस ओळखतो असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेडकरांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून जुणे-जाणते नेते वसंत मगर यांना उमेदवारी दिली आहे. वंचितकडून सोशल फॉम्युला वापरण्याचे मनसुबे स्पष्ट झाले आहे. वंचितने मंगळवारी रात्री पार पडलेल्या राज्य समितीच्या बैठकीत निर्णय घेत आज त्याची घोषणाही केली. पक्षाने केवळ विरोधकांनाच नव्हे तर स्वपक्षीयांनासुद्धा धक्का दिला. कालच जिल्हा बैठकीत सुजात आंबेडकर व युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार याना उमेदवारी देण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. मात्र आज वंचितने राजकीयदृष्ट्या बाजूला पडलेल्या वसंत मगर यांच्या नावाची घोषणा केली आहे. बहुजन महासंघाचा अविश्‍वसनीय अकोला पॅटर्न प्रकाश आंबडेकर यांनी यापूर्वी यशस्वी करुन दाखवला होता. त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी या पॅटर्नला कोणत्याही पक्षाल दुर्लक्षित करता आलेले नाही. गेल्या वर्षाच्या मध्यानंतर राज्यात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात नवीन प्रयोगाला बळ दिले.

आंबेडकर-जरांगे नवी राजकीय आघाडी – प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी करण्याची शक्यता आहे. कारण वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामुळे ते आता महाविकास आघाडीसोबत नसणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे मविआला धक्का बसला आहे.  प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचे समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS