सातारा / प्रतिनिधी : देशातील सर्वप्रथम पहिली वीरनारींची फार्मर प्रोड्यूसर कंपनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी स्थापन झाली. या वीरनारींच्या कंपनीला मद
सातारा / प्रतिनिधी : देशातील सर्वप्रथम पहिली वीरनारींची फार्मर प्रोड्यूसर कंपनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी स्थापन झाली. या वीरनारींच्या कंपनीला मदत होण्याच्या दृष्टीने 269 इंजिनिअर युनिटने मौजे धोंडेवाडी, ता. खटाव येथे 1 कोटी 90 लाख लिटर पाण्याच्या साठ्यासाठी तीन शेततळी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच शेततळ्यापर्यंत पाईप लाईन करून देणे, झाडे लागवडीकरिता खड्डे व इतर कामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. या कामासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर आनंद पाथरकर, सेना मेडल (निवृत्त) व जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे-पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कामामध्ये 269 इंजिनियर रेजिमेंटचे मेजर राहुल मलिक यांच्या मार्गदर्शन खाली शेततळ्याचे व इतर कामे होणार आहेत.
वीरनारी फार्मा प्रोड्यूसर कंपनीचे मुख्य उद्दिष्टे, शेतजमिनीचा विकास आणि व्यवस्थापन करणे, तीन हेक्टरवर केशरी आंबा, एक हेक्टरवर पेरू लागवड करणे, धोंडेवाडी येथे व्यवसाय केंद्राची स्थापना करणे, ज्यामध्ये कंपनी नंतरच्या सुविधा जसे की पॅक हाऊस, क्लिनिंग आणि ग्रेडिंग युनिट, कोल्ड स्टोरेज आणि ट्रेड सेंटर, शेतकरी गटांमध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि जमिनीचे सेंद्रिय प्रमाणीकरण सुलभ करणे, किमान 1000 महिला भागधारकांची नोंदणी करून माजी सैन्य कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि व्यापार आणि व्यवसाय विकास सुलभ करण्यासाठी इतर शेतकर्यांसाठी शेतजमिनीचा विकास करणे असा आहे.
COMMENTS