Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाचाल तर वाचाल मोफत वाचलनाला तर्फे शालेय साहित्याची वाटप

बीड प्रतिनिधी - महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने शहरातील विविध भागात मोफत शिकवणी वर्ग मोफत शिकवणी वर्गा चालवीत आहेत, त्यापैकी प्रकाश आंबेडकर नगर

 ऑक्सीजन हब हिमायत बाग वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले
महाराष्ट्रातील सात अधिकारी व जवानांना संरक्षण अलंकरण सन्मान
समतेच्या विचारांचे पाईक

बीड प्रतिनिधी – महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने शहरातील विविध भागात मोफत शिकवणी वर्ग मोफत शिकवणी वर्गा चालवीत आहेत, त्यापैकी प्रकाश आंबेडकर नगर इमामपूर रोड येथे, गेल्या दोन वर्षापासून चालू असलेल्या मोफत शिकवणी वर्गाला ज्येष्ठ सदस्य सदस्य जी.एम.भोले, डी.जी. वानखेडे, डी.एम. राऊत, बी.डी. तांगडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबद्दल वर्गाच्या शिक्षिका,पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सर्व प्रथम डॉ. जगदीश वाघमारे व शिकवणी वर्गांच्या शिक्षिका विशाखा वाघमारे यांनी तथागतांच्या प्रतिमेला पुष्प तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रीवार वंदन करण्यात आले. जी. एम. भोले सरांनी सामान्यज्ञान, इंग्रजी व गणितातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. व विद्यार्थ्यांना उत्तेजन मिळावे म्हणून वाचाल तर वाचाल फिरते वाचनालयातर्फे जूलै महिन्यातील मासिक चाचणीमधील पहिली ते पाचवी व सातवी ते आठवी गटातील प्रत्येकी चार मुलां – मुलींना शालेय साहित्य (वही – पेनचे) वाटप करण्यात आले. व उर्वरित विद्यार्थ्यांनी देखील आपली प्रगती दाखवावी म्हणून शालेय साहित्य (वही – पेन)चे उपस्थित 34 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयातर्फे मुलांना खाऊ वाटप करून सरनयतयाने कार्यक्रमाची सांगता झाली.    लवकरच जय भीम बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, पुरग्रस्त काँलनी, बीड येथे मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्याचा मानस आहे. तरी जास्तीत जास्त दानदात्यांनी सहभाग नोंदवून आपले दान कॅप्टन राजाभाऊ आठवले यांच्या गुगल पे नंबर – 9522204578 या नंबर वरती किंवा जी.एम.भोले, डी.जी.वानखेडे यांच्याकडे दान द्यावे ही विनंती. आयोजक महामानव मोफत शिकवणी वर्ग टीम, च्या मार्फत आव्हान करण्यात येत आहे.

COMMENTS