Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशातील आत्मदीप हॉस्पिटलमध्ये आज मोफत तपासणी शिबीर

नेवासाफाटा ः आत्मदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नेवासा फाटा आणि साईदीप हेल्थकेअर प्रा लि अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी व उपचार शिबीरा

शेजमजूरांच्या डोळ्यात निघाल्या अळ्या
१० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक | DAINIK LOKMNTHAN
शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी ः राजेश परजणे

नेवासाफाटा ः आत्मदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नेवासा फाटा आणि साईदीप हेल्थकेअर प्रा लि अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन नेवासाफाटा येथील आत्मदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रांगणात मंगळवारी 5 मार्च रोजी सकाळी 11 ते 4 यावेळेत करण्यात आले आहे. या शिबिरात सर्व प्रकारचे सांधेविकार (खांदा, खुबा, गुडघा इत्यादी) व इतर प्रकारचे अस्थीविकार यांची मोफत तपासणी व उपचार सुप्रसिद्ध सांधे तज्ञ डॉ अभिजित नालकर यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे. सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिरात गुडघा व इतर सांधे निकामी झालेल्या व आवश्यकता असलेल्या  रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून जूने इंप्लान्ट काढण्यासाठी विशेष सूट या शिबिरात देण्यात येणार आहे शिबिरात सहभागी होणार्‍या रुग्णांनी आत्मदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नेवासा फाटा नोंदणीसाठी क्रमांक: 9139135580, 7218602007 रुग्णवाहिका संपर्क: 9075772222 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS