Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोटनिवडणुकीत भाजपकडून दहशतीचा वापर

नाना पटोले यांची पुणे पोलिसांकडे तक्रार

पुणे/प्रतिनिधी ः कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप नेते भय आणि दहशतीचे वातावरण पसरवत आहेत. भाजपचे खासदार, आमदार व मंत्र्यांचे गुंड कार्यकर्त्यांना

‘राष्ट्रवादी’चा काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न : नाना पटोले
मोटारसायकल इन्व्हो अपघात तीन गंभीर जखमी
loland : सतार यांच्या निवासस्थानासमोर जिल्हाध्यक्ष संजय गाडे प्राणांतिक उपोषण करणार

पुणे/प्रतिनिधी ः कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप नेते भय आणि दहशतीचे वातावरण पसरवत आहेत. भाजपचे खासदार, आमदार व मंत्र्यांचे गुंड कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. नाना पटोले यांनी शिष्टमंडळासह पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची रात्री उशीरा भेट घेतली.

निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप कार्यकर्ते मतदारांना प्रलोभने व आमिषे दाखवत आहेत. दत्तवाडी, गंज पेठ, लोहियानगर अशा भागांमध्ये उघड माथ्याने पैशांचे वाटप सुरू आहे. पोलिसांच्या नावाने अनेकांना फोन जात आहेत. तुमच्या राजकीय गुन्ह्यांमध्ये खतरनाक वाढ करू असा दम भरत आहेत. हे फोन कोण करत आहेत हे आयुक्तांनी शोधून काढले पाहिजे, याबरोबरच शहरात नाकाबंदी वाढवली पाहिजे.भाजप पोलिस यंत्रणेचा वापर अशा पद्धतीने करत आहे हे आम्ही कदापि सहन करणार नाही. पोलिस आयुक्तांनी आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी दक्ष राहून भाजपाच्या काळ्या कारवायांना पायबंद घातलाच पाहिजे, असे निवेदनही दिले. यावेळी शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, भानुदास माली, अमित मेश्राम आदी होते. भाजपने देशात अघोषित हुकूमशाही राबवली आहे.या जूलमी व अत्याचारी व्यवस्थेला हाकलून लावण्याची सुरुवात कसब्यातून होणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात नागरिकांवर अत्याचार व त्रास देणार्‍यांचा कडेलोट करण्यात येत असे, आता कसब्याच्या या निवडणुकीत तुम्ही भरघोस मते महाविकास आघाडीच्या पदरात टाकून भाजपचा कडेलोट करण्याची संधी चालून आली असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS