Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘पीएफआय’ कडून शाळेचा देशविरोधी कृत्यांसाठी वापर

राष्ट्रीय तपास यंत्रणेने कोंढव्यातील ब्ल्यू-बेल्स शाळेचे दोन मजले केले सील

पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियातर्फे (पीएफआय) पुण्यातील कोंढवा परिसरातल्या ब्ल्यू-बेल्स शाळेचा देशविरोधी कृत्यासाठी उपयोग केला जात होता. राष्ट्री

Bhivandi : बॉयफ्रेण्डसोबत राहण्यासाठी पतीच्या हत्येची सुपारी l LokNews24
शाळेत शिक्षकांचे विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य | LOK News 24
राजकारणाचे गुन्हेगारीकरण कसे रोखणार ?

पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियातर्फे (पीएफआय) पुण्यातील कोंढवा परिसरातल्या ब्ल्यू-बेल्स शाळेचा देशविरोधी कृत्यासाठी उपयोग केला जात होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या शाळेचा चौथा आणि पाचवा मजला सील केला. एनआयएतर्फे याबाबत माहितीचे निवेदन जारी करण्यात आले आहे.
पीएफआय मुस्लिम तरुणांना कट्टरतेचे धडे देऊन त्यांना दहशतवादी कारवायांकडे वळवले जात असल्यामुळे या  संघटनेच्या देशभरातील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. त्याअंतर्गत पुण्याच्या कोंढव्यातील ब्ल्यू-बेल्स स्कूल या खासगी शाळेवर कारवाई करण्यात आली. या इमारतीमध्ये तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा ठपका एनआयएने केलाय. या कारवाईच्या निषेधार्थ संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये काही वादग्रस्त घोषणा दिल्या गेल्याचाही आरोप झाला होता. त्यावेळी बेकायदा मोर्चा काढल्याच्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, देशभरात ‘एनआयए’ने केलेल्या कारवाईबाबत नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामध्ये रविवारी पुण्याच्या ब्ल्यू-बेल्स शाळेच्या इमारतीवर टाच आणण्यात आली. या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याचा वापर पीएफआयने  देशविरोधी कृत्यांसाठी केल्याचा, तसेच, मुस्लिम तरुणांना या परिसरांमध्ये सशस्त्र प्रशिक्षण दिलेले जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भात दिल्लीच्या विशेष न्यायालयात 20 जणांविरुद्ध आरोपपत्र  दाखल करण्यात आल्याची माहिती ‘एनआयए’ने दिली.

COMMENTS