Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण तालुक्यातील उसाला तुरे; साखर कारखान्या अभावी उस उत्पादक चिंतेत

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. उसाचे पीक तोडणी योग्य होऊन बराच काळ लोटला तरीदेखील का

हिंगणीमध्ये विजेच्या धक्क्याने युवक ठार
पुसेगाव येथे बैलबाजार न भरल्याने शेतकरी अडचणीत
कापसाला भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्याला विकावा लागत आहे कमी भावात कापूस

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. उसाचे पीक तोडणी योग्य होऊन बराच काळ लोटला तरीदेखील कारखान्याकडून ऊस तोडणीबाबत कोणताही कार्यवाही झाली नसल्याने शेतकर्‍यांचा ऊस दिवसेंदिवस पुढे जात आहे. यामुळे वरकुटे-मलवडी परिसरातील शेतकरी मोठ्या कचाट्यात सापडला आहे. ठिकठिकाणी ऊसाने तुरे टाकले आहेत.
यामुळे शेतकर्‍यांच्या मनी अनेक प्रश्‍नांना उधाण आले आहे. तुरे टाकल्याने ऊसाच्या रसात घट होत असल्याचे ही बोलले जात आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला दर मिळणार का? यावर प्रश्‍न चिन्ह उभे राहत आहे. दर मिळाला तर वजनात घट होणार याचे काय अशा एक अनेक प्रश्‍नांनी शेतकर्‍यांच्या मनी काहुर माजले आहे. यावर शेतकरी संघटना कोणती भूमिका घेणार तसेच प्रशासन कारखाना मालकावर कारवाई करणार का? असे एक ना अनेक प्रश्‍न शेतकर्‍या समोर उभे आहेत. शेतकर्‍यांवर एकीकडे अवकाळीचे संकट तर दुसरीकडे याचे संकट शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे. यावर शेतकरी संघटना काय भुमिका घेतील हेही पाहणे गरजेचं ठरेल.
महाबळेश्‍वरवाडीचा तलाव, पडळकर खडक तलाव, तुडकाकडा तलाव या तिन्ही तलावाच्या काठावरील बहुतांश शेतकर्‍यांनी व आजूबाजूच्या तलाव क्षेत्रातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. उसाला मोठ्या प्रमाणावर तुरे लागले आहेत. माण तालुक्यात साखर कारखाना नसल्याने शेतकर्‍यांसमोर ऊस तोडणीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वरकुटे-मलवडीसह, बनगरवाडी, महाबळेश्‍वरवाडी, खरातवाडी व कुरणेवाडी परिसरातील शेतकर्‍यांच्या ऊसाला तुरा निघाला आहे. त्यामुळे ऊसाच्या वजनात घट होते व उत्पन्न कमी होते. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे.

COMMENTS