ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना ईडीचा दणका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना ईडीचा दणका

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे  आणखी एक मंत्री अडचणीत आ

शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात सायकल रॅली
अहमदनगर जिल्ह्यातील 96 महसुली मंडळाचा दुष्काळी गावांमध्ये समावेश
१० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक | DAINIK LOKMNTHAN

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे  आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे  हे आता सक्त वसुली संचालनालयाच्या  फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या 90 एकर जमिनीवर ईडीने टाच आणली आहे. 

राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याची 90 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. तक्षशिला सिक्युरिटीजच्या नावावर ही जमीन होती. याचबरोबर तनपुरे यांच्या मालकीच्या 4.6 एकरच्या दोन बिगरशेती जमिनीही जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 26 ऑगस्ट 2019 रोजी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीच्या आधारे ईडीने करचुकवेगिरीची चौकशी सुरू केली होती. चौकशीनंतर ईडीने तनपुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.  उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला होता. राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना हा तत्कालीन अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांनी संगनमत करून कवडीमोल दराने तनपुरेंना विकला, असा आरोप करण्यात आला होता. हा कारखाना व कारखान्याच्या इतर मालमत्ता विकताना कोणत्याही योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नव्हते. या कारखान्याचे मूल्य 26.32 कोटी रुपये असताना त्याची केवळ 12.95 कोटी रुपयांनी विक्री झाली होती. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात अहवाल सादर केला असून, त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.  नागपुर मधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त. तनपुरे यांची एकूण 13 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर मधील 90 एकर जमीन आहे. तर अहमदनगर मध्ये चार एकर जमीन ईडी कडून जप्त करण्यात आली आहे.

COMMENTS