Homeताज्या बातम्यादेश

रेल्वेची 25 टक्क्यांपर्यंत भाडेकपात

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः रेल्वेच्या सेवेत अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधांनी नव्या रेल्वे सेवेत दाखल होत असल्या तरी, रेल्वेचे भाडे कमी करण्याची मागणी क

विभुतवाडी येथील भीषण अपघातात सातार्‍यातील तिघांचा मृत्यू
मुख्य सूत्रधार मोकाट असल्याची खंत
आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः रेल्वेच्या सेवेत अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधांनी नव्या रेल्वे सेवेत दाखल होत असल्या तरी, रेल्वेचे भाडे कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर ‘अनुभूती’ आणि ‘व्हिस्टाडोम’ डब्यांसह वातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या रेल्वे गाडयांच्या चेअर कार आणि ‘एक्झिक्युटिव्ह’ श्रेणीच्या प्रवासीभाडयात 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. ही सवलत एका वर्षांसाठी लागू असेल, मात्र सुट्टी-उत्सव विशेष रेल्वे गाडयांना ती लागू होणार नाही. ही सवलत तात्काळ लागू होणार आहे. मात्र या निर्णयाआधी आरक्षण केलेल्या प्रवाशांना परतावा दिला जाणार नाही, असे रेल्वे मंडळाने स्पष्ट केले आहे.
रेल्वे मंडळाने गेल्या 30 दिवसांत प्रवाशांचा 50 टक्क्यांपेक्षा कमी प्रतिसाद मिळालेल्या रेल्वे गाडयांमधील भाडे कमी करण्याचे आदेश रेल्वे विभागांना दिले आहेत. त्यानुसार प्रामुख्याने कमी अंतराच्या रेल्वे गाडयांच्या भाडयात सूट दिली जाणार आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे दर कमी होणार आहेत. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट अधिभार आणि जीएसटीचे दर पूर्वीप्रमाणेच राहतील, त्यात सवलत मिळणार नसल्याचे रेल्वे मंडळाने म्हटले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून सध्या तीन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावत आहेत. सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव आणि सीएसएमटी ते सोलापूर या तिन्ही गाडयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वे मंडळाच्या सवलत निकषात या गाडया बसत नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली

COMMENTS