Homeताज्या बातम्यासंपादकीय

अवकाळीचा तडाखा

शेतकरी हा प्रत्येक वेळेस नागवला जातो, त्याला कधी निसर्ग आपल्या तालावर नाचवतो, तर कधी उत्पादनाच्या किंमती त्याला आपल्या नाचायला भाग पाडतात. शेतकर्

कठोर कायद्याने अत्याचार थांबेल का ?
तापमानवाढीतील बदल
परदेशी विद्यापीठांसाठी भारतीय बाजारपेठ खुली

शेतकरी हा प्रत्येक वेळेस नागवला जातो, त्याला कधी निसर्ग आपल्या तालावर नाचवतो, तर कधी उत्पादनाच्या किंमती त्याला आपल्या नाचायला भाग पाडतात. शेतकर्‍यांचे रडणे नेहमीचेच झाल्यामुळे त्यांना कुणी वाली नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. खरीप हंगामात पाऊस झाला नाही की, शेतकरी हवालदिल होतो, रब्बी हंगामात अवकाळी पाऊस झाला की, शेतकरी पुन्हा एकदा नागवला जातो, त्यासोबतच ओला, कोरडा दुष्काळ पाचवीला पुजलेलाच. यामुळे शेतकरी कायम नागवला जातो. खरंतर शेतकरी स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. झालेले नुकसान भरून काढण्याची त्याची ऐपत असायला हवी, मात्र तो स्वयंपूर्ण होणार नाही, याची काळजी व्यवस्था पूर्णपणे घेतांना दिसून येत आहे. भारतासारख्या राज्यात आजमितीस सेवा क्षेत्र झपाट्याने वाढतांना दिसून येत आहे. सेवा क्षेत्र वाढणे प्रगतीचे लक्षण असले तरी, सेवा क्षेत्र शेतीवर अवलंबून असल्याचे दिसून येते. कारण सेवा क्षेत्रासाठी लागणारा कच्चा माल हा शेतीतूनच जातो. त्यामुळे शेती क्षेत्र कोसळले तर, सेवा क्षेत्र कोसळेल, त्यामुळे शेती क्षेत्र कोसळणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्याची गरज असतांना, शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. राज्यावर पुन्हा एकदा कोसळलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. अवकाळीच्या तडाख्याने रब्बी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना यंदा निसर्ग साथ देत नसल्याचे चित्र आहे. राज्यात खरीप हंगामामध्ये ऐनवेळी पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांना दुष्काळाचा सामना करावा लागला, तर दुसरीकडे, ऐन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांना खरीप पिके घेता आली नसली तरी, रब्बी पिके घेण्यास सोपे जाईल असे वाटले होते, त्यादृष्टीने शेतकर्‍यांनी रब्बी पिकांची लागवड देखील केली. मात्र डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची रब्बी पिकांची पुरती वाट लागली आहे. गहू, हरभरा, द्राक्षे, आंब्यांचा मोहोर यासह फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसामुळे आंब्याचा मोहर गळून पडल्याने, तर सांगली जिल्ह्यात द्राक्ष मण्यांना तडे जाण्याच्या भीतीने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्‍वर आणि चिपळूण या तालुक्यांमधील आंब्याच्या बागांना पावसाचा फटका बसला. सध्या मोहोर, कणी, सुपारीएवढी कैरी आणि मोठी कैरी असे विविध टप्पे झाडावर दिसत आहेत. त्याला पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी स्वंयपूर्ण होण्याकडे पावले उचलण्याची खरी गरज आहे. त्यासाठी सरकारी अनुदान, सरकारी मदत यावर अवलंबून राहण्याऐवजी शेतकर्‍यांनी आपल्या मालाची किंमत आपण ठरवण्यासाठी आंदोलन उभारण्याची खरी गरज आहे. जगातल्या प्रत्येक वस्तूची किंमत त्या त्या उत्पादनांशी संबंधित मालक ठरवतो, मात्र जो पिकवतो, तो त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवू शकत नाही, हो मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे शेतकरी कायम नागवला जातो. शेतकरी सर्वांचे भरण-पोषण करतो, सर्वांची भूक भागवतो, मात्र पिकवणाराच उपाशी राहतो. त्यामुळे शेतकर्‍यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी त्याने शेतीसोबत जोडधंदा सुरू केला पाहिजे. काही तासांपूर्वी आलेल्या आकडेवारीनुसार केवळ वर्षभरात अमरावती विभागातील तब्बल 1140 शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले असल्याचे समोर आले आहे. मोठ-मोठे उद्योगपती कोट्यावधी रूपयांचे कर्ज डोक्यावर असतांना, देशातून पलायन करतात, आणि काही हजार रूपयांत असणार्‍या कर्जापोटी आमचा शेतकरी आत्महत्या करतो, या वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे शेतीधोरण बदलण्याची गरज आहे. शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षाला 12 हजार रूपये जमा करून, त्याला आपण पंगू बनवत आहोत, एकीकडे 12 हजार रूपये देत असलो तरी, दुसरीकडे त्याचे शोषण किती करत आहोत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

COMMENTS