Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट

एप्रिल अखेरीस पाऊस कोसळण्याची चिन्हे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात मार्च महिन्यापासून सातत्याने अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल

 लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव पाडले बंद 
राजारामबापू कारखाना निवडणूक बिनविरोध; संचालक मंडळात 14 नवे चेहरे
टोमॅटोने शेतकऱ्याला केले श्रीमंत

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात मार्च महिन्यापासून सातत्याने अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, अवकाळी पावसाचे संकट काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. कारण शुक्रवारी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरीस राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एप्रिल महिन्याच्या शवेटच्या आठवड्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 48 तासांत विदर्भातील अनेक शहरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर सांगली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
कोकणातील तापमान पुढील दोन-तीन दिवस कोरडे राहण्याची शक्यता आहे. दमट हवा, अधिक आर्द्रता आणि तापमानामुळे कोकणात अधिक उष्ण आणि अस्वस्थ वातावरण राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात देखील परिणाम जाणवण्याचा अंदाज आहे, ज्यात तापमान जरी कमी असले तरी आर्द्रतेमुळे अधिक तापमान वाढू शकते. तर विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज कायम आहे. विदर्भात आज (22 एप्रिल) काही ठिकाणी वादळी वार्‍यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलडाणा  जिल्ह्यात काल संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव परिसरात क वादळी वार्‍यासह तुफान अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास तीन तास या परिसरात वादळी वार्‍याने आणि पावसाने धुमाकूळ घातला.

पुढील चार दिवस तापमान वाढ – मध्य महाराष्ट्र ते दक्षिण तामिळनाडू दरम्यान वार्‍याची खंडितता म्हणजेच कमी दाबचा पट्टा हा शुक्रवारी तेलंगणा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत जात आहे, त्यामुळे हवेतील दमटपणा कमी झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी 48 तासामध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वार्‍यासह, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यामध्ये पुढील पाच दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.

COMMENTS