Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पायावर अलीकडेच शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी त्यांना किमान एक महिन्याची विश्रांती घे

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार
स्त्रीवाद ही समानतेची चळवळ ः डॉ गिताली
अन्यथा, टोल नाके गुंडगिरीची केंद्र ठरतील !


पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पायावर अलीकडेच शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी त्यांना किमान एक महिन्याची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः सामाजिक माध्यमांवर छायाचित्रासह देत नागरिकांकडून आशीर्वाद आणि शुभेच्छा मागितल्या आहेत.
मोहोळ यांनी सांगितले की, सुमारे 29 वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्या दुखापतीमुळे त्यांना कुस्ती सोडावी लागली. दीर्घकाळ या दुखण्याकडे दुर्लक्ष झाले होते; मात्र अलीकडच्या काळात वेदना वाढू लागल्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला असता शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या संसद अधिवेशन सुरू असतानाच ही शस्त्रक्रिया करावी लागल्याने काही काळ कामांपासून दूर राहावे लागणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अधिवेशनातील उपस्थिती, देशभरातील दौरे, लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग यावर काही काळ विराम घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदा होणार्‍या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबतही त्यांनी विशेष उल्लेख करत या सर्व उपक्रमांपासून दूर राहावे लागणे दुखापतीपेक्षाही अधिक त्रासदायक असल्याचे सांगितले. मात्र नागरिकांच्या शुभेच्छांच्या बळावर लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होऊ, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. महिन्याभरानंतर पूर्वीपेक्षा अधिक जोमाने कामाला लागण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS