Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घाटकोपर येथे पाणी केंद्रावर ठाकरे गटाकडून जनआक्रोश हंडा मोर्चा 

मुंबई प्रतिनिधी - मुंबई च्या असल्फा, साकीनाका, सुंदरबाग, अशोक नगर इत्यादी विभागात पाणी नसल्याने त्रस्त नागरिकांचा उप जलाभियंता कार्यालय वर मोर्

मुंबई महानगरपालिका रुग्णालयात भूमिगत कचरा पेट्या बसवणार
श्री गजानन नागरी सहकारी बँकेला 2 कोटी 24 लाखाचा नफा
जिल्हा परिषदेत इंदिरा गांधी यांची जयंती साजरी 

मुंबई प्रतिनिधी – मुंबई च्या असल्फा, साकीनाका, सुंदरबाग, अशोक नगर इत्यादी विभागात पाणी नसल्याने त्रस्त नागरिकांचा उप जलाभियंता कार्यालय वर मोर्चा काढला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट चे माजी नगरसेवक किरण लांडगे, विजेंद्र शिंदे नागरिकांचा मोर्चा उपजल अभियंता यांच्या कार्यालयात पोहचला असून तिथल्या रस्त्यावर नागरिक ठिय्या देत आहेत. गेले काही दिवस या सगळ्या विभागाला पाणी न मिळाल्याने हाती हंडा,मडकी घेऊन महिला या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. पालिका अधिकारी आणि पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीत असून नागरिक तात्काळ पाणी देण्याची मागणी करीत आहेत. जर आमच्या विभागाला पाणी मिळाले नाही तर आम्ही पाणी केंद्रावर आमरण उपोषण करणार असल्याचे ठाकरे  गटाचे माजी नगरसेवक किरण लांडगे आणि विजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे. तर आंदोलक महिलांनी ही संताप व्यक्त केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

COMMENTS