Homeताज्या बातम्यादेश

राज्याप्रमाणेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला

नवी दिल्ली ः अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे बोलले जात होते. मात्र राज्याप्रमाणेच केंद्राचा देखील मंत्रिमंडळ

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यास भाजप उमेदवार देणार -देवेंद्र फडणवीस | LOKNews24
मेक्सिकोत ट्रकला भीषण अपघातात 53 जणांचा मृत्यू| DAINIK LOKMNTHAN
भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचा ः केंद्रीय मंत्री शहा

नवी दिल्ली ः अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे बोलले जात होते. मात्र राज्याप्रमाणेच केंद्राचा देखील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. शिवसेनेतून शिंदे गटाने बंड करत राज्यात भाजपासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केली आहे. त्यानतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेतून 39 आमदार आणि त्यानंतर 12 खासदार बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली असून, आमदार, खासदारांसह नगरसेवक, पदाधिकारी यांनी देखील शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. दरम्यान, राज्यातील मंत्रिमंडळात शिंदे गटातील 9 आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. त्यानंतर आता केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, यात शिंदे गटातील तीन खासदारांना संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या तीन मंत्रिपदात एक कॅबिनट व दोन राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र केंद्राचा विस्तार रखडल्याने शिंदे गटाचे खासदार गॅसवर असल्याचे बोलले जात आहे.

एकिकडे राज्यातील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे, जानेवारीच्या अखेरीस दुसरा मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. यामुळे शिंदे गटातील खासदारांची धाकधूक वाढली आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील तीन खासदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. या तीन मंत्रिपदात एक कॅबिनट व दोन राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर म्हणजे रखडल्यामुळं शिंदे गटातील खासदारांचे टेन्शन वाढले असून, राज्यातील आमदारांप्रमाणे खासदार देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, केंद्रात शिंदे गटाला तीन मंत्रिपद मिळण्याची माहिती सुत्रांनी दिला आहे. यात 1 कॅबिनेट मंत्रिपद तर 2 राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मंत्रिपदामध्ये खासदार मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर पश्‍चिम महाराष्ट्रातील श्रीरंग बारणे आणि विदर्भाचे प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.राज्य मंत्रिमंडळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार तब्बल 39 दिवसानंतर झाला. म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी भाजपातील व शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदारांना मंत्रिपदं देण्यात आली. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होऊन चार महिने उलटल्यानंतरही दुसर्‍या टप्प्यातील विस्तार होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये दिवसागणिक नाराजी वाढत आहे. परिणामी हे नाराज आमदार मंत्रीपद न मिळाल्यामुळं शिंदे गटातून फुटणार का? या आमदारांमध्ये खदखद व नाराजी असल्यानं शिंदे गटात विस्फोट होणार का? अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

COMMENTS