अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटनांत वाढ झाली असतांना, गुरुवारी अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरमध्ये अज्ञात व्
अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटनांत वाढ झाली असतांना, गुरुवारी अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरमध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. केडगाव देवी मंदिराकडे जाणार्या रोडवर एका वीट भट्टीजवळ पस्तीस वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात खुनाच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मयताची ओळख पटवण्याचे काम कोतवाली पोलीस करत आहेत. मयताची ओळख पटल्यानंतर ही हत्या कुणी केली आणि कोणत्या कारणातून केली याचा शोध घेणे पोलिसांसाठी सोप्पे होईल. कोतवाली पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. तपासाअंती सर्व स्पष्ट होईल. अहमदनगर जिल्ह्यात एकापाठोपाठ खुणाच्या घटनेत मोठ्या संख्येने वाढ होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी बालिकाश्रम रोडवर ओंकार भागा नगरे या युवकाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली होती. शेवगाव येथे चोराच्या हल्ल्यात व्यापारी आणि त्याच्या भावजयी ची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तसेच पाथर्डी येथे एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह विहिरीत आढळून आले होते. या घटना ताज्या असतानाच पारनेर तालुक्यातील गव्हाणवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणातून डोक्यात कुर्हाड घालून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्यामुळे जिल्हा आणि शहरात वाढणार्या हत्येमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीरपणे उपस्थित होतांना दिसून येत आहे.
COMMENTS