Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माळशेज घाटात दरड कोसळून काका-पुतण्याचा मृत्यू

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडतांना दिसून येत आहे. माळशेज घाटात देखील रिक्षा

पतंजली योग समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव साजरा
इक्विटी शेयर्सच्या विक्रीतून भांडवल उभारणी करण्याची योजना 
रानभाज्यांचे महत्व पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टिने महोत्सवाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करनार : पालकमंत्री दादाजी भुसे

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडतांना दिसून येत आहे. माळशेज घाटात देखील रिक्षावर अचानक डोंगरकडा पडल्यामुळे यात काका-पुतण्या या दोघांचा मृत्यू झाला असून, आणखी तिघेजण जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबईतील रहिवासी असणारे 30 वर्षीय राहुल भालेराव आणि 7 वर्षीय स्वयंम भालेराव अशी मृत्यू झालेल्या काका-पुतण्याची नावे आहेत. भालेकर कुटुंब मंगळवारी रात्री मुलुंडहून चंदनापुरी संगमनेर या त्यांच्या मूळ गावी रिक्षेने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. टोकावडे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये माळशेज घाटातील बोगद्याजवळ महादेवाच्या मंदिर परिसरात हा अपघात झाला आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामध्ये डोंगरावरील मलबा भालेकर कुटुंबीयांच्या रिक्षेवर पडला. या अपघातात चालक राहुल भालेराव आणि त्यांचा सात वर्षांचा पुतण्या स्वयम भालेरावचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षेतील अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. रिक्षातील तीन जणांचा जीव थोडक्यात वाचला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. कल्याणवरुन अहमदनगरच्या दिशेने जाण्यासाठी माळशेज घाटातून जाणारा हा एकमेव मार्ग आहे.

COMMENTS