सध्या सोशल मिडीयावर हत्येचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कानाखाली मारली त्या व्यक्तीने रागात थेट छातीवरच गोळी झाडली आ
सध्या सोशल मिडीयावर हत्येचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कानाखाली मारली त्या व्यक्तीने रागात थेट छातीवरच गोळी झाडली आहे. दिवसाढवळ्या झालेला हत्येचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.किरकोळ कारणावरून ही हत्या करण्यात आली आहे. व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी काही लोक उभे आहेत. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जोरात कानशिलात लगावते. पण तिथं असलेले इतर लोक त्यांना थांबवतात. त्यानंतर दोघंही शांत होतात.पण कानशिलात लागवलेल्या व्यक्तीला राग सहन झाला नाही. तो दरवाजाजवळ पोहोचताच कानाखाली मारणाऱ्या व्यक्तीच्या छातीवर गोळी झाडून ही व्यक्ती फरार होते. या हत्येचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.ही घटना शिकागोतील वेस्ट गारफिल्ड पार्कमधील एका दुकानातील आहे.

COMMENTS