Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री अंबाबाई मंदिरात चोरी करताना दोन महिलांना रंगेहात पकडले

कोल्हापूर / प्रतिनिधी : श्री अंबाबाई मंदिरात आज सकाळी 9 ते 10 च्या सुमारास दोन महिला चोरीचा प्रयत्न करत असताना सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात निदर्शन

वाघजाईवाडीत भिंत खचून दोन जनावरांचा मृत्यु
35 वर्षे सोसलं… आता परिवर्तन घडवा : निशिकांत भोसले-पाटील
विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 13 सप्टेंबर रोजी :उपआयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर

कोल्हापूर / प्रतिनिधी : श्री अंबाबाई मंदिरात आज सकाळी 9 ते 10 च्या सुमारास दोन महिला चोरीचा प्रयत्न करत असताना सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात निदर्शनास आल्या. तसेच भक्ताच्या तक्रारीनुसार पाहणी केले असता दोन महिला चोरी करताना निदर्शनास आल्या. देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या मदतीने या महिलांना मुद्देमालासहित रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
यामध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मंदिर पोलीस इन्चार्ज राजेंद्र कांबळे, महिला पोलीस सहायक फौजदार नंदिनी मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल देवानंद बल्लारी, देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष विभाग प्रमुख राहुल जगताप, अवधूत चौगुले, अनिकेत बागल व सिक्युरिटी रोहित आवळे, गोसावी यांच्या साह्याने अवघ्या दहा मिनिटात या महिलांना ताब्यात घेण्यात आले.

COMMENTS