Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गृहमंत्र्यांच्या शहरात दोन व्यापार्‍यांची हत्या

50 लाखाची सुपारी देवून हत्या मृतदेह जाळून वर्धा नदीत फेकले

नागपूर/प्रतिनिधी ः गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या दो

राहुरी तालुक्यात तरूणाचा खून करून मृतदेह फेकला विहिरीत
दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवल्याने प्रियकराने तरुणीचा चिरला गळा.
प्रेयसीच्या डोक्यात प्रेशर कुकर घालून हत्या

नागपूर/प्रतिनिधी ः गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या दोन व्यापार्‍यांचा गोळ्या घालून निघृन हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे शहरामध्ये खळबळ उडाली. व्यापार्‍यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वर्धा नदीत आढळून आले आहेत. 50 लाखांची सुपारी घेऊन हे खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
निराला कुमार सिंह (वय 43) आणि अंबरीश देवदत्त गोळे (वय 41) अशी खून झालेल्या व्यापार्‍यांची नावे आहेत. दीड कोटी रुपयांची गुंतवणूक काही दिवसांत दुप्पट करण्याचे आमिष दाखवून आरोपींनी या दोघांना कोंडाळी फार्महाउसवर नेले होते. व्यापारी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी 25 जुलै रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार सीताबर्डी आणि सोनगाव पोलीस ठाण्यात केली होती. विशाल पुंज नावाच्या व्यक्तीवर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला होता. त्या आधारे पोलिसांनी तपास केला असता या प्रकरणात ओंकार तलमले याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. अधिक तपासात तलमले हाच या कटाचा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलमले यानं सर्वप्रथम गोळे आणि सिंह यांच्याशी पुंज याच्या माध्यमातून संपर्क साधला. गृह सजावट आणि कलाकृतींचा व्यवसाय असल्याचे सांगून आणि राजकीय कनेक्शन असल्याची थाप मारून तलमले याने गोळे आणि सिंह यांना जाळ्यात ओढले. त्यांना दीड कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट देण्यास सांगितले. त्या बदल्यात अल्पावधीतच त्यांना 2.80 ते 3 कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले. लकी तुर्केल या फार्महाउसवर त्यांची भेट ठरली. दुसरीकडे तलमले याने हर्ष वर्मा (वय 22), लकी संजय तुर्केल (वय 22), हर्ष बागडे (19) आणि दानेश शिवपेठ (22) या चौघांना गोळे आणि सिंह यांना संपवण्यासाठी 50 लाखांची सुपारी दिली. त्याने वर्माला पिस्तुलाची व्यवस्था करण्यास सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार वर्मा यांच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा आधीपासूनच दाखल आहे. खुनाच्या दिवशी तलमले हा गोळे आणि सिंह यांना सिव्हिल लाईन्स येथील एका कॅफेमध्ये भेटला. त्यानंतर ते दोघे त्याच्या कारमध्ये बसले. त्यांच्या मागोमाग मारेकर्‍यांच्या गाड्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चारही कार कोंढाळीच्या दिशेने जाताना दिसत आहेत. फार्महाउसवर गेल्यावर तलमले आणि दोन्ही व्यापार्‍यांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी बेसावध असलेल्या गोळे आणि निराला सिंहवर वर्मा आणि तलमले यानं तीन पिस्तुलांतून पाच राऊंड फायर केले. त्यांनी त्यांनी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर अर्धवट जळालेले मृतदेह ताडपत्रीत गुंडाळून, दोरीने बांधून वर्धा नदीत टाकण्यात आले. या घटनेनंतर तलमले पुण्याला पोहोचला. पोलिसांनी चौकशी केली असतांना त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. नागपूरमध्ये परतताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर आणखी चौघांना अटक केली.

COMMENTS