इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील महाराष्ट्र अॅकॅडमीच्या दोन विद्यार्थिनींची बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक पदी निवड झाली आहे. य


इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील महाराष्ट्र अॅकॅडमीच्या दोन विद्यार्थिनींची बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक पदी निवड झाली आहे. यामध्ये कु. वैशाली विलास पवार (बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली) व कु. नाजमिन नईम मोमीन (काले, ता. कराड, जि. सातारा) यांचा समावेश आहे.
वैशाली विलास पवार यांनी डिप्लोमा त्यानंतर बी. टेक इलेक्ट्रिकल पूर्ण केले आहे. वडील विलास पवार हे शेतकरी आहेत. त्यांच्या कुटुंबातील वैशाली ही पहिलीच प्रशासकीय अधिकारी बनली आहे. खुल्या मुलींमध्ये 103 व्या क्रमांकाने निवड झाली आहे. नाजमिन मोमीन यांचे वडील पेंटिंगचे काम करतात. घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी, आयडियल एज्युकेशन फोरम, कराडचे जाकीर शिकलगार व डांगे साहेब यांच्या आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र अॅकॅडमी, इस्लामपूरमध्ये प्रवेश घेतला, 0.75 ने टॅक्स असिस्टंट ही पोस्ट हुकली. ओबीसी महिलांमध्ये 38 व्या क्रमांकाने निवड झाली. नाजमिन मोमीन हिने एमएस्सी झूलॉजी केले आहे.
महाराष्ट्र अकॅडमीचे तज्ञ प्रा. सुभाष खोत, प्रा. उमाकांत वाघमारे, प्रा. समीर सताळकर, प्रा. प्रकाश कुंभार, प्रा. गावंडे, प्रा. विजयकुमार शिंदे, प्रा. अजित प्रधान, प्रा. डोईफोडे व संस्थापक सचिव अस्लम शिकलगार यांचे यशस्वी विद्यार्थिनींना बहुमोल मार्गदर्शन लाभले.
COMMENTS