राज्यात लम्पीने 32 जनावरांचा मृत्यू :  मंत्री विखे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात लम्पीने 32 जनावरांचा मृत्यू : मंत्री विखे

तब्बल 1435 जनावरे बाधित ; 2 लाख 80 हजार पशुंचे लसीकरण

अकोला/प्रतिनिधी : देशभरात जनावरांमधील लम्पी रोगाचा प्रसार वेगाने वाढत असतांना, महाराष्ट्रात देखील या रोगाचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे. महारा

चिखलठणवाडीला मिळाले हक्काचे डाक कार्यालय
राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातूमन कमविले कोटयवधींची माया ?
रेमडीसीवीर-ऑक्सिजनचा पुन्हा तुटवडा…रुग्णांसह प्रशासनही चिंतेत..

अकोला/प्रतिनिधी : देशभरात जनावरांमधील लम्पी रोगाचा प्रसार वेगाने वाढत असतांना, महाराष्ट्रात देखील या रोगाचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 17 जिल्ह्यातील 1435 जनावरांना लम्पी चर्म रोगााची लागण झाली असून, त्यापैकी 32 जनावरे दगावल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील(Radhakrishna Vikhe-Patil) यांनी गुरुवारी अकोल्यात दिली.
लम्पीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेगाने लसीकरण करण्याची गरज असून, त्यासाठी खासगी पशु डॉक्टरांची लसीकरणासाठी थेट मदत घ्यावी. त्यांना मानधन देण्यासंदर्भात जिल्हा स्तरावर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिल्याची माहितीही मंत्री विखे यांनी दिली.  जिल्ह्यात लम्पीच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अकोला तालुक्यातील निपाणा आणि पैलपाडा या गावात भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लम्पीच्या प्रादूर्भावाची राज्यातील स्थिती सांगितली. राज्यात 17 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 2 लाख 80 हजार पशुंचे लसीकरण झाला आहे. उद्भव झालेल्या ठिकाणांच्या 5 किमी त्रिज्या परिसरात येणार्‍या सर्व जनावरांच्या लसीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. अजून 5 लाख 71 हजार पशुंचे लसीकरण अद्याप बाकी आहे, असेही त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस वाढता प्रादूर्भाव पाहता लसीकरण वेगाने करावे लागणार आहे. त्यासाठी मनुष्यबळाच्या प्रश्‍नावर मात करण्यासाठी खासगी व्यवसाय करणार्‍या पशु डॉक्टरांची थेट मदत घ्यावी. त्यांना मानधन देण्यासाठी जिल्हा स्तरावर निर्णय घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

COMMENTS