Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाझर तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

कन्नड तालुक्यातील नागद सायगव्हाण परीसरात दुर्दैवी घटना घडली

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील नागद सायगव्हाण परीसरात एक दुर्दैवी घटना समोर आली असून, पाझर तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींच

शहाजीराजे भोसले स्मारकाचा विकास करणार ः केंद्रीय मंत्री डॉ. कराड
सार्वजनिक बांधकाम विभाग नवनिर्मिती अणि सृजनशीलतेचे दुसरे नाव
महिला सरपंचाना मिळणार आदर्श पुरस्कार

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील नागद सायगव्हाण परीसरात एक दुर्दैवी घटना समोर आली असून, पाझर तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सोमवारी बालदिनाच्या दिवशी ही दुर्देवी घटना घडली. काजल परशुराम पवार (वय 15 वर्षे), मीनाक्षी परशुराम पवार (वय 13 वर्षे, रा. होळणांथा ता. शिरपूर जि. धुळे) असे या मुलींचे नाव आहे.  या दोघी बहिणी सकाळी साडे आकरा वाजेच्या सुमारास भिलदरी हद्दीतील छोट्या पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र यावेळी त्यांचा पाण्यात पाय घसरला आणि त्या पाण्यात बुडाल्या. यावेळी तिथे त्यांना वाचवण्यासाठी कोणीच नसल्याने त्यांचा  बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

COMMENTS