Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरेगावमध्ये दोन दुकाने खाक; साडेतीन लाखांचे नुकसान

कोरेगाव / सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर मार्केट यार्ड परिसरात गुरुवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे दोन दुकानांना आग लागली. यामध्ये दोन्ही द

आगामी निवडणुकांमध्ये एकी कायम दाखवा : रामराजे नाईक-निंबाळकर यांचे आवाहन
प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करु : ना. उदय सामंत
एसटीच्या संपामुळे टीईटी परीक्षेस 1634 गैरहजर

कोरेगाव / सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर मार्केट यार्ड परिसरात गुरुवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे दोन दुकानांना आग लागली. यामध्ये दोन्ही दुकानातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या आगीत साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
योगेश पडवळ यांचे रेडियम नंबर प्लेटचे तर त्याच्या शेजारी जमीर कडकडी यांचे बॅटरीचे दुकान आहे. मध्यरात्री दोन वीज वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाले. याच्या ठिणग्या वैष्णवी आटर्स या दुकानात पडल्या. त्यानंतर काही वेळातच आग लागली. या आगीची धग शेजारच्या दुकानाला लागली. यामध्ये दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत. आग लागल्याचे समजताच माजी नगरसेवक नितीन ओसवाल यांच्यासह नागरिक, व्यापार्‍यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच याची माहिती रहिमतपूर पालिकेच्या अग्निशामक दलाला दिली. अग्निशामक दल दाखल झाल्यानंतर काही तासाने ही आग आटोक्यात आली.

COMMENTS