Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महालक्ष्मी’ हॉस्पिटलमधील आयसीयु सेंटरने मिळणार जीवदान : डॉ.तोरडमल

कर्जत /प्रतिनिधी ः अत्यंत कठीण परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर डॉ. नितीन खरात, डॉ. युवराज शिंदे आणि डॉ. कृष्णकांत गावंडे यांनी महालक्ष्मी मल्

श्रीसंत महिपती महाराजांचा फिरता अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
आ. रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
गौण खनिज उत्खनन करणा-या वाहनांवर जीपीएस बंधनकारक

कर्जत /प्रतिनिधी ः अत्यंत कठीण परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर डॉ. नितीन खरात, डॉ. युवराज शिंदे आणि डॉ. कृष्णकांत गावंडे यांनी महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयु सेंटर उभारून राशीनसह परिसरातील रुग्ण व नागरिकांसाठी जीवनदान देण्याचे काम केले आहे. या हॉस्पिटलमधील अद्ययावत सुविधांमुळे राशीनच्या वैभवात भर पडली आहे, असे वक्तव्य कर्जत तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश तोरडमल यांनी केले.

राशीन येथे महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील आयसीयु सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राशीन परिसरातील रुग्णांना अत्यावश्यक सुविधा मिळण्यासाठी भिगवण किंवा बारामतीला जावे लागत असे. आता राशीनमध्ये महालक्ष्मी हॉस्पिटलच्या रूपाने सुविधा मिळणार असून, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. यावेळी डॉक्टर्स असोसिएशनचे राशीन शहराध्यक्ष डॉ.पंकज जाधव, डॉ.विक्रम मोरे,डॉ. मधुकर कोपनर, युवक नेते शहाजी राजेभोसले, उद्योजक बापू धोंडे,राशीनचे उपसरपंच शंकर देशमुख,शाहू राजेभोसले,विजय मोढळे,राम कानगुडे, उद्योजक बबन जंजिरे, नयन मंडलेचा, डॉ.शिवाजी काळे,डॉ.बाळासाहेब कानगुडे,डॉ.विनायक जगताप,राशीनचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप व्हरकटे, तुकाराम सागडे, डॉ.शिवाजी काळे,मेडिकल असोसिएशनचे रविंद्र काळे,आखोणीचे सरपंच सचिन चव्हाण यांच्यासह सर्व डॉक्टर्स,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.राशिन पंचक्रोशीतील जनतेच्या प्रेमाच्या जोरावर आज महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयु सेंटर चालू करू शकलो, असे डॉ.नितीन खरात,यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. नितीन खरात यांनी केले. आभार डॉ.युवराज शिंदे,डॉ. कृष्णकांत गावंडे यांनी मानले.

COMMENTS