Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराई तील दोन वाळु माफियांची हार्सुल काराग्रृहात रवानगी

गेवराई प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील राजापूर येथील लखन काळे व गोरख काळे या दोघांना हार्सुल येथे रवानगी, जबरी चोरी,वाळु गौण खनीज चोरी ,जीवे मारण्

टेस्लाच्या इंजिनिअरवर रोबोटचा हल्ला
वर्षभरात एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्र उभारणार ः उद्योगमंत्री सामंत
इतके कसे निर्दयी, एका सहीसाठी अडवला पोलिसाचा मृतदेह! l LOKNews24

गेवराई प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील राजापूर येथील लखन काळे व गोरख काळे या दोघांना हार्सुल येथे रवानगी, जबरी चोरी,वाळु गौण खनीज चोरी ,जीवे मारण्याच्या धमक्या अश्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या गोरख सदाशिव काळे व लखन तुकाराम काळे या दोन वाळु माफिया गुंडावर एमपीडीए कायद्याअंर्तगत कारवाई करत त्यांची हर्सुल काराग्रहात रवानगी करण्यात आली.याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक बीड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.गेवराई तालुक्यात गोरक काळे आणि लखन काळे या दोघांनी प्रचंड धुमाकुळ घातला होता गोरख विरोध्द तलवाडा पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल आहेत.यामध्ये अनेक गुन्हे गंभीर स्वरुपाचे आसुन 6गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत.तर दोन गुन्हांचा तपास सुरु आहे.तसेछ लखन काळे यांच्यावरही वाळु गौण खनीज चोरी ,रस्ता आडविणे ,चढ्याभावाने वाळुची विक्री करणे असे गंभीर स्वरुपाचे ,5 गुन्हे दाखल आहेत.दरम्याण या दोघांवर मपोकाअंर्तगत दोन वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.परंतु या दोघांनी ही कायद्याला पायमली तुडवत गेवराईत दहशत निर्माण केल्याने या दोघांवर एमपीडी अंर्तगत कारवाई करण्यात आली.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राजगूरु,स्थानिक गून्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे ,तलवाडा पोलीस स्टेशन सपोनी शंकर वाघमोडे,पोउपनि बाबासाहेब भवर,पोह सचिन अलगट ,पोह नारायण काकडे,गोपणीय अमंलदार रामेश्वर खंडागळे,पोका नारायण पिसाळ,पोका बाळु जाधव     यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

COMMENTS