पुण्यात पिस्टल, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पिस्टल, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

पुणे : देशी बनावटीचे ३ पिस्टल, ९ जिवंत काडतुसे, ३ मॅक्झिन विक्री बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने जेरबंद केले. आरोप

 मद्यपी वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
इस्लामपूर पालिकेसाठी राष्ट्रवादीचा जबाबदारी विभागण्याचा फंडा; पालिका निवडणुकीत विजयभाऊ पाटील यांची उणीव भासणार
माजी पंतप्रधान नरसिंह रावसह तिघांना भारतरत्न

पुणे : देशी बनावटीचे ३ पिस्टल, ९ जिवंत काडतुसे, ३ मॅक्झिन विक्री बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने जेरबंद केले. आरोपीकडून ०३ पिस्टल,०९ जिवंत काडतुसे, ४ सुट्टे मॅगझिन व एक इर्टीगा गाडी असा एकूण सहा लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अजय ऊर्फ महाराज कमलाकर भोरे (वय २८, रा. के ऑफ दुबे निवास, आनंदनगर चौकाजवळ, मुंढवा, पुणे) आणि ओंकार प्रदीप कांबळे (वय २२, रा. काकरंबा, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपींवर चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२चे अधिकारी व अंमलदार गस्त करत असताना खराडी येथे दोघेजण पिस्टल विक्रीकरिता थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले.

COMMENTS