शिक्रापूर : शिक्रापूर, ता. शिरुर परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हे दाखल केले असून राहुल राम राठोड

शिक्रापूर : शिक्रापूर, ता. शिरुर परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हे दाखल केले असून राहुल राम राठोड व योगेश शंकर सारगे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांची नावे आहे. शिक्रापूर, ता. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमोल दांडगे, नारायण वाळके, योगेश आव्हाड हे सायंकाळच्या सुमारास परिसरात चोर्या रोखण्याच्या हेतूने गस्त घालत होते. त्यावेळी शिक्रापूर चाकण रोड येथील जुना टोलनाका येथे दोन इसम संशयितपणे फिरत असल्याचे पोलिसांना दिसले. छोलीस त्यांच्या जवळ जाऊ लागताच दोघे पळून जाऊ लागल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दोघे चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याबाबत पोलीस शिपाई नारायण चंद्रकांत वाळके (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी राहुल राम राठोड (वय 22, सध्या रा. कोरेगाव भीमा, ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बसवनगर ता. बसवकल्याण जि. बिदर कर्नाटक) व योगेश शंकर सारगे (वय 19, सध्या रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. कासार बालकुंदा ता. निलंगा जि. लातूर) या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहे.

COMMENTS