पुणे ः आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोंढव्यातून एका 16 वर्षीय तरूणाचे अपहरण करून सासवडला नेले. त्यानंतर तेथे त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना

पुणे ः आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोंढव्यातून एका 16 वर्षीय तरूणाचे अपहरण करून सासवडला नेले. त्यानंतर तेथे त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतिस्पर्धी टोळीला माहिती देत असल्याच्या संशयावरून हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. तर, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. साईराज लोणकर (25, रा. कोंढवा खुर्द), ओंकार कापरे (25, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लोणकर, कापरे ही दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
COMMENTS