Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमेरिकेतून गांजा मागवणारे दोघे अटकेत

टपालाद्वारे मागविला 10 लाखांचा गांजा

मुंबई: अमेरिकेतून टपालाद्वारे गांजा मागवल्याच्या आरोपाखाली सीमाशुल्क विभागाने मुंबईतून दोघांना अटक केली. याप्रकरणी 115 ग्रॅम उच्च प्रतीचा गांजा ज

देशमुखांचा राजीनामा; वळसे नवे गृहमंत्री ; सीबीआयकडे तपास सोपवण्याच्या निर्णयाला आव्हान देणार
शिक्षक बँक सत्ताधार्‍यांनी 24 कोटींचा हिशेब लपवला ; गुरुमाऊलीच्या एका गटाचा आरोप
खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा करण्यावर निर्बंध कायम

मुंबई: अमेरिकेतून टपालाद्वारे गांजा मागवल्याच्या आरोपाखाली सीमाशुल्क विभागाने मुंबईतून दोघांना अटक केली. याप्रकरणी 115 ग्रॅम उच्च प्रतीचा गांजा जप्त करण्यात आल्याचे अधिकार्‍याने सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपयांहून अधिक आहे. ते खरेदी करण्यासाठी बिटकॉइन या कूट चलनाचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे.
यश कलानी (28) व सुकेतू तळेकर (46) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते दोघेही वांद्रे येथील रहिवासी आहेत. तळेकर रेस्टॉरन्ट मालक आहे. मुंबईतील परदेशी टपाल कार्यालयात अमेरिकेतून आलेल्या पाकिटामध्ये गांजा असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार सीमाशुल्क विभागाकडून आझाद नगर टपाल कार्यालयात ते पार्सल अडवण्यात आले. त्या संशयीत पाकिटाचा माग काढला. त्यावेळी तेथील कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेऊन सर्व प्रकार सांगण्यात आला. त्यानुसार बनावट टपाल तयार करून संबंधित पत्त्यावर सीमाशुल्क अधिकारी पोहोचले. तेथे सीमाशुल्क विभागाने दोघांना अटक केली. आरोपींविरोधात यापूर्वीही अमलीपदार्थाप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. 9 किलो गांजा प्रकरणी 2020 ला अंमलीपदार्थ विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 1 कोटी 62 लाख रुपये होती. सध्या परदेशातून येणार्‍या गांजाचे प्रमाणही वाढले आहे. कुरियर अथवा टपालाद्वारे गांजा मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. पैशांची देवाण-घेवाणही तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाते. त्यासाठी बिटकॉइन सारख्या कूट चलनाचाही वापर केला जात आहे. तसेच डार्कनेटच्या माध्यमातून कुठल्याही ठिकाणी पाहिजे ते अमलीपदार्थ मिळणे शक्य झाले आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय टपाल सेवेचाही वापर केला जात असल्याचे अधिकार्‍याने सांगितले.

COMMENTS