Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडाची फेक वेबसाईट बनवणारे दोघे अटकेत

मुंबई : म्हाडाची चक्क हुबेहुब वेबसाईट बनवून त्या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिक फॉर्म भरत होते. व डिपॉजिटचे पैसे देखील या वेबसाईटने दिलेल्या अकाउं

अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलिसांची मोठी कारवाई
 निपाणा गावातील मुख्य मार्गावर घाणीचे साम्राज्य
ममता बॅनर्जींच्या भाच्याला ईडीचे समन्स

मुंबई : म्हाडाची चक्क हुबेहुब वेबसाईट बनवून त्या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिक फॉर्म भरत होते. व डिपॉजिटचे पैसे देखील या वेबसाईटने दिलेल्या अकाउंटवर भरत होते. त्यातून अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर फेक वेबसाईटचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी मुंबईच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त असे की, म्हाडाने मुंबईतील घरांसाठी 2030 घरांची लॉटरी काढली असून अर्ज भरायला देखील सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या जाहिरातीनंतर मुंबईकरांचाही मोठा प्रतिसाद म्हाडाला मिळत असून चौकशीसंदर्भाने विविध माध्यमातून म्हाडाशी संपर्क साधला जात आहे. त्यातच, म्हाडाच्या याच जाहिरातीचा आधार घेऊन म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास फेक वेबसाईट बनवून नागरिकांची लूट करण्यात येत असल्याचीही घटना समोर आल्या आहेत. स्वत: म्हाडाने याची दखल घेत पोलिसांता तक्रार दाखल केली होती. म्हाडाच्या घरासाठी डिपॉझिट रक्कम म्हणून भरण्यात येणार्‍या 50 हजार आणि 1 लाख रुपयांच्या रकमेतून मोठा अपहार करण्यात येत असल्याचे उघडकीस आले, त्यानंतर ही तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत म्हाडाच्या माहिती संचार आणि तंत्रज्ञान विभागाकडून वांद्रे -कुर्ला संकुल येथील सायबर कक्षाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार सायबर पोलिसांनी पुढील कारवाई करत नुकतीच याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. एकाला नालासोपार्‍यातून तर दुसर्‍याला माहीममधून सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यातील एक म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे.  बीकेसी सायबर सेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपार्‍यामधून एकाला तर माहीममधून एकाला अटक करण्यात आली आहे. अमोल पटेल (29 वर्षे) आणि कल्पेश सेवक (35 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार कल्पेश सेवक असल्याचे तपासात समोर आले आहे. कल्पेश सेवक यानेच बनावट संकेतस्थळ तयार केले होते. तर या बनावट संकेतस्थळावरील पेमेंट लिंकद्वारे पन्नास हजाराची जी रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा झाली होती ती कल्पेश सेवक याच्या बँक खात्यामध्ये जमा झाली होती. हाच धागा पकडत पोलिसांनी तपास केला आणि आरोपींना पकडण्यात यश मिळवले.

COMMENTS