कल्याण रेल्वे स्थानकातून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण रेल्वे स्थानकातून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण.

घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याण प्रतिनिधी- रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवरून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या दोन आरोप

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार
शॉर्टसर्किटमुळे सरताळे येथे साडेचार एकर क्षेत्रावरील ऊस जळला
भंडारदरा व निळवंडेच्या आवर्तनातील पाण्याची नासाडी

कल्याण प्रतिनिधी- रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवरून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या दोन आरोपींच्या कल्याण रेल्वे पोलिसांनी अवघ्या सात तासात मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अमित शिंदे आणि पूजा मुंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. अपहरणाची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान या दोघांनी या मुलाला का पळवलं ? त्यांनी आधी असे प्रकार केले आहेत का ? मुले चोरणाऱ्या रॅकेट शी संबंधित आहेत का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS