कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुका गुरुमाऊली व सदिच्छा मंडळाच्या महिलांचे वतीने शनिवारी निवारा गणेश स्टेज या ठिकाणी हळदी कुंकवाचा समारंभ संपन्न झ
कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुका गुरुमाऊली व सदिच्छा मंडळाच्या महिलांचे वतीने शनिवारी निवारा गणेश स्टेज या ठिकाणी हळदी कुंकवाचा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्याताई आढाव होत्या. तसेच प्रमुख उपस्थिती कोपरगाव पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी काही क्षण राखून ठेवले पाहिजे. तसेच या प्रसंगी अनेक छोटे मजेशीर फनी गेम घेण्यात आले .यामध्ये सर्व महिला शिक्षिका उस्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गुरुमाऊली महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्याताई आढाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीमती प्रतिभाताई राऊत महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष श्रीमती चंदन तरवडे महिला आघाडीच्या तालुका सरचिटणीस श्रीमती मनीषा शिंपी तसेच कार्यकारी अध्यक्ष श्रीमती स्मिता डुबे, वर्षा दरवडे व तालुका कार्याध्यक्ष सुशीला राठोड तसेच उषा सुपेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कोपरगाव तालुका बँकेचे संचालक व इतर सर्व कार्यकारणीचे सदस्य यांचे सहकार्य लाभले.
COMMENTS