Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयनेत गढूळ पाणी पुरवठा; प्रकल्पावर महिलांचा हंडा मोर्चा

कोयना : प्रकल्पाच्या कार्यालयावर महिलांनी काढलेला हंडा मोर्चा. पाटण / प्रतिनिधी : राज्याला शुध्द पाणी पुरवठा करणार्‍या कोयनेतच गढूळाचे पाणी जनतेला

शिक्षणरत्न पुरस्काराने दीपक भुजबळ सन्मानीत
घर नाही म्हणणार्‍या जयंत पाटलांच्या नावावर 3 कोटींचा बंगला
खूनातील संशयिताचा सांगली जिल्हा रुग्णालयात धिंगाणा

पाटण / प्रतिनिधी : राज्याला शुध्द पाणी पुरवठा करणार्‍या कोयनेतच गढूळाचे पाणी जनतेला प्यावे लागत आहे. कोयना प्रकल्पाच्या अधिकारी वर्गाचा बेजबाबदार कारभार याला कारणीभूत असून येत्या 20 दिवसात कोयना, रासाटी, हेळवाक परिसरातील जनतेला पिण्यासाठी शुध्द पाणी द्यावे, अशी मागणी कोयना, रासाटी, हेळवाक या गावातील महिलांनी कोयना प्रकल्पाकडे केली. कोयना प्रकल्पाने हा प्रश्‍न सोडवला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना पदाधिकार्‍यांनी दिला.
गत सहा महिन्यापासून कोयना रासाटी गावातील जनतेला गढूळाचे पाणी प्यावे लागत असल्याने या गावात आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. कोयना प्रकल्पात जलशुध्दीकरण प्रकल्प कुचकामी ठरत आहे. कोयना प्रकल्पाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ तीन गावच्या महिलांनी शिवसेना व युवा सेनेच्या माध्यमातून कोयना प्रकल्पावर हंडा मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व युवा सेनेचे अध्यक्ष अजय देसाई व नरेंद्र शेलार यांनी केले.
अजय देसाई म्हणाले, गत सहा महिन्यापासून जलशुध्दीकरण प्रकल्प असूनही कोयना रासाटी, हेळवाक या गावात अशुध्द पाणी पुरवठा होत आहे. आमच्या वाडवडिलांच्या त्यागातून कोयना धरण व नेहरू स्मृती उद्यान उभे राहिले आहे. स्थानिकांना नेहरू स्मृती उद्यानात निशुल्क प्रवेश मिळावा. तसेच या तीन गावातील जनतेला शुध्द पाणी पुरवठा झाला नाही तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.
कोयना, रासाटी, हेळवाक या ठिकाणी शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यास आमच्याकडून विलंब लागला. शुध्द पाणी देण्यासाठी एक आराखडा तयार केला असून तीन आठवड्यात कायमस्वरूपी शुध्द पाणीपुरवठा करण्याचे आम्ही नियोजन केले आहे. तीन आठवड्यात तात्पुरत्या स्वरूपात शुध्द पाणी पुरवठा होईल, असे कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी बोलताना स्पष्ट केले.
युवासेनेने आयोजित केलेल्या मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, शिवसेना नेते गजानन कदम, गणपतभाई कदम उपस्थित होते. हंडा मोर्चा यशस्वी करण्यासाठी अक्षय कदम, गणेश कदम, सुशांत पवार, साहिल मोहिते, प्रशांत पाटील, रूपेश पाटील, अशोक कांबळे, प्रशांत जाधव, रवींद्र शिंदे या युवा सैनिकांनी मेहनत घेतली. सपोनि चंद्रकात माळी यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS